Honor X9b फोनच्या भारतीय लाँच डेट कन्फर्म! सर्वात मजबूत डिस्प्लेसह होणार जबरदस्त Entry। Tech News 

Honor X9b फोनच्या भारतीय लाँच डेट कन्फर्म! सर्वात मजबूत डिस्प्लेसह होणार जबरदस्त Entry। Tech News 
HIGHLIGHTS

Honor X9b स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी

Honor X9b सह कंपनीने #RIPTemperedGlass हा हॅशटॅग दिला आहे.

या फोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता

Honor X9b स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी झाली आहे. अलीकडेच हा फोन Amazon India वर स्पॉट झाला होता. या लिस्टिंगच्या माध्यमातून फोनच्या काही प्रमुख फीचर्सची माहिती समोर आली आहे. त्याबरोबरच, आता कंपनीने अखेरीस या स्मार्टफोनची लाँच डेट उघड केली केली आहे.

विशेष म्हणजे कंपनीने यासह #RIPTemperedGlass हा हॅशटॅग दिला आहे. या हॅशटॅगद्वारे हे टीज करण्यात आले आहे की, हा फोन मजबूत डिस्प्ले गुणवत्तेसह दाखल होणार आहे. फोनच्या डिस्प्लेवर टेम्पर्ड ग्लास येणार नाही. हा फोन भारतीय बाजारात कधी येईल ते बघुयात.

हे सुद्धा वाचा: IQOO Quest Days: प्रसिद्ध कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळतोय प्रचंड Discount, बघा ऑफर्स। Tech News

Honor X9b 5G

Honor X9b ची भारतीय लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Honor X9b स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. हा फोन 15 फेब्रुवारी 2024 ला लाँच होणार आहे. फोनच्या लाँच डेटसोबतच कंपनीने या फोनसाठी #RIPTemperedGlass हा हॅशटॅग वापरला आहे. म्हणजेच या फोनचा डिस्प्ले खूप मजबूत असणार आहे, ज्याच्या सुरक्षेसाठी टेम्पर्ड ग्लास लावण्याची गरज भासणार नाही.

Honor X9b चे Amazon लिस्टिंग

प्रसिद्ध टिपस्टरने अलीकडेच Honor X9b ची Amazon सूची उघड केली होती. Amazon लिस्टिंगद्वारे फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. फोनमध्ये ब्लॅक आणि ग्रीन असे दोन कलर ऑप्शन्स मिळतील. लीकवर विश्वास ठेवला तर, या फोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा फोन Android 13 वर काम करेल. Honor Ultra Bounce Anti-Drop डिस्प्ले तंत्रज्ञान या फोनमध्ये दिले जाऊ शकते.

एवढेच नाही तर, Amazon सूचीद्वारे फोनचे डिझाइन पाहिले जाऊ शकते. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लिस्टिंगनुसार हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येतो. सेल्फी कॅमेरासाठी डिस्प्लेमध्ये पंच-होल कटआउट दिला जाऊ शकतो. फोनच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल मिळण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये LED फ्लॅश ठेवता येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo