Honor X9b 5G स्मार्टफोन आत नुकतेच म्हणजेच काळ 15 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची पहिली विक्री आजपासून म्हणजेच 16 फेब्रुवारीपासून भारतीय बाजारपेठेत सुरू होणार आहे. विशेषतः कॅमेराशिवाय फोनचे बॅटरी स्पेक्सदेखील आकर्षक आहेत. यासोबतच, कंपनीने भारतात BT कॉलिंगसह नवीन स्मार्टवॉच आणि TWS लाँच केले आहेत. चला तर जाणून घेऊयात पहिल्या सेलमधील स्मार्टफोनवरील ऑफर्स-
Honor X9b 5G स्मार्टफोनची विक्री आज दुपारी 12 वाजतापासून सुरू होणार आहे. तुम्ही लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. पहिल्या सेलमध्ये फोनसोबत अनेक ऑफर्स देखील मिळणार आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन फक्त एकाच 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे.
या व्हेरिएंटसह हा फोन भारतीय बाजारात 25,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. जो सेलदरम्यान 22,999 रुपयांना उपलब्ध असेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेच्या कार्डवर 3000 रुपयांची झटपट सूट दिली जाईल. याव्यतिरिक्त, 699 रुपयांचा एक विनामूल्य चार्जर देखील उपलब्ध असेल.
Honor च्या या 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी यात 108MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP थर्ड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 16MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. फोनमध्ये 5800mAh बॅटरी आहे, जी एका चार्जवर तीन दिवस टिकेल. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी यात फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक सारखी फीचर्स आहेत.