लेटेस्ट Honor X7b 5G फोन लवकरच होणार लाँच, अधिकृत साइटवर 108MP कॅमेरासह सूचीबद्ध। Tech News

लेटेस्ट Honor X7b 5G फोन लवकरच होणार लाँच, अधिकृत साइटवर 108MP कॅमेरासह सूचीबद्ध। Tech News
HIGHLIGHTS

Honor X7b 5G कंपनीचा आगामी स्मार्टफोन लवकरच लाँच होणार

कंपनीने Honor X7b 5G फोन ग्लोबल साइटवर लिस्ट केला आहे.

साइटनुसार हा फोन सिंगल 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटसह सादर केला जाईल.

Honor X7b 5G कंपनीचा आगामी स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. यापूर्वी कंपनीने Honor X9b फोन भारतात लाँच केला होता, जो लाँच होताच लोकप्रिय बनला. या फोनची किंमत 25,999 रुपये इतकी आहे. दरम्यान, आगामी Honor X7b 5G फोन सर्व फीचर्ससह ग्लोबल साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. सध्या फोनच्या किंमतीशी संबंधित तपशील समोर आलेला नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Honor X7b 5G शी संबंधित सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: 8GB रॅम असलेल्या या Google फोनवर मिळतोय प्रचंड Discount, कॉम्बो ऑफरसह करा मोठी बचत। Tech News

Honor X7b 5G संबंधित तपशील

वर सांगतिल्याप्रमाणे, कंपनीने Honor X7b 5G फोन ग्लोबल साइटवर लिस्ट केला आहे. Honor X7b 5G फोनमध्ये 6.8 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2,412 x 1,080 पिक्सेल आहे. याशिवाय, फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. साइटनुसार या फोनमध्ये सिंगल 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट सादर करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

honor x7b 5g

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यासह 108MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 35W फास्ट ऑनर सुपरचार्ज टेक्नॉलॉजी देखील मिळेल.

लक्षात घ्या की, या मॉडेलची किंमत अद्याप पडद्याआड ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये क्रिस्टल सिल्व्हर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक असे तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध असतील.

Honor X9b 5G

कंपनीने अलीडकेच Honor X9b फोन भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 25,999 रुपये आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह येतो. या फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन 16MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. जो नाईट, पोर्ट्रेट, प्रो, पॅनोरमा आणि HDR सारख्या कॅमेरा फीचर्ससह उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo