Honor चा 12GB पर्यंत RAM आणि 50MP कॅमेरासह स्वस्त फोन लाँच, वाचा सविस्तर
Honor X40 GT चीनमध्ये लॉन्च झाला आहे.
Honor X40 GT मध्ये 50MP मेन सेन्सर आहे.
Honor X40 GT स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Honor X40 GT चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नियमित आवृत्तीनंतर X40 सिरीजमधील ही नवीन ऑफर आहे. डिव्हाइस स्टॅंडर्ड व्हेरिएंटप्रमाणेच सर्व फीचर्स ऑफर करतो. चला जाणून घेऊया फोनमध्ये काय आहे विशेषता…
हे सुद्धा वाचा : केवळ ₹ 6999 मध्ये Redmi चा एक उत्तम स्मार्टफोन, आकर्षक डिझाइनसह मिळतील दमदार फीचर्स
Honor X40 GT मध्ये 2,388 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.81-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे. यात सेंट्रल अलाइन पंच-होल कॅमेरा आणि 144Hz रिफ्रेश रेट आहे. डिव्हाइसमध्ये पॉवर बटनमध्ये एम्बेड केलेला साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
Honor X40 GT मध्ये एक सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यामध्ये X-फॉर्मेशनमध्ये तीन सेन्सर आणि एक LED फ्लॅश आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मेन सेन्सर, 2MP डेप्थ-ऑफ-फील्ड लेन्स आणि 2MP मॅक्रो युनिट समाविष्ट आहे. याशिवाय फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी स्नॅपर आहे.
Honor X40 GT स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येते. फोनमध्ये 7GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये हीट डेसिपेशन व्हीसी लिक्विड कूलिंग सिस्टम आहे. डिव्हाइसमध्ये 4,800mAh बॅटरीने 66W जलद चार्जिंगसाठी समर्थन दिले आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, Honor X40 GT Android 12 वर आधारित MagicUI 6.1 वर चालतो.
Honor X40 GT वर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, WiFi, Bluetooth, USB-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे.
Honor X40 GT ची किंमत
फोनची किमंत 8GB + 256GB व्हेरियंटसाठी RMB 2,099 (~$292) पासून सुरू होते, तर 12GB + 256GB पर्यायाची किंमत RMB 2,399 (~$334) आहे. हे उपकरण रेसिंग ब्लॅक, मिडनाइट नाईट ब्लॅक आणि टायटॅनियम एम्प्टी सिल्व्हर कलरमध्ये देण्यात आले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile