Honor X40 सिरीजला GT व्हेरिएंट मिळत आहे, गेल्या आठवड्यात एक अफवा पसरली होती. कंपनीने अधिकृतपणे त्याच्या आगमनाची पुष्टी केली आणि आगामी स्मार्टफोनसाठी एक टीझर शेअर केला. X40 GT या गुरुवारी, ऑक्टोबर 13 म्हणजेच उद्या दाखल होणार आहे. त्यासोबतच, हा फोन स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटद्वारे समर्थित असेल.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Amazon दिवाळी सेलमध्ये OnePlus 10R च्या किमतीत मोठी कपात, पहा नवीन किंमत
अधिकृत टीझरमध्ये मागील बाजूस एका मोठ्या राऊंडेड आयलँडवर तीन कॅमेरे देखील दिसून आले आहेत, जे LED फ्लॅशसह एक्स-फॉर्मेशन आहेत.
Honor X40 GT चीनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता लॉन्च होईल. Honor X40 GT चा टीझर कंपनीने Weibo वर रिलीज केला आहे. Honor X40 GT साठी Honor Mall वेबसाइट आणि इतर ऑनलाइन स्टोअर्सवर प्री-बुकिंग सुरू आहे, जरी किंमत अद्याप उघड झाली नाही. फोनला पंचहोल डिस्प्ले मिळेल आणि ब्लॅक शेड्स मिळतील, अशी माहिती मिळाली आहे. पॉवर आणि व्हॉल्यूम बटन्स डावीकडे असतील.
Honor X40 GT ची किंमत काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Honor X40 च्या जवळपास असेल. Honor X40 ची सुरुवातीची किंमत 1,499 चीनी युआन म्हणजेच सुमारे 17,100 रुपये आहे. या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.