Honor View 20 मोबाईल फोन 48MP कॅमेरा आणि या फीचर्स सह 29 जानेवारीला होऊ शकतो लॉन्च

Honor View 20 मोबाईल फोन 48MP कॅमेरा आणि या फीचर्स सह 29 जानेवारीला होऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

Honor View 20 मोबाईल फोन असा एकमात्र पहिला फोन असणारा आहे, जो 48MP च्या रियर कॅमेरा सह लॉन्च केला जाणार आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला एक पंच होल डिस्प्ले पण मिळणार आहे. हा फोन एक्सक्लूसिवली अमेझॉन इंडिया वर सेल केला जाऊ शकतो.

महत्वाचे मुद्दे:

  • Honor View 20 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 48MP चा रियर कॅमेरा मिळणार आहे.
  • या मोबाईल फोन मध्ये एक पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • मोबाईल फोन मध्ये लिंक टर्बो टेक्नॉलॉजीचा वापर इंटरनेट कनेक्टिविटी चांगली करण्यासाठी केला जाणार आहे.
     

Honor ने भारतात आपला Honor View 20 मोबाईल फोन लॉन्च करण्यासाठी भारतीय मीडियाला निमंत्रण द्यायला सुरवात केली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि हा मोबाईल फोन 29 जानेवारीला भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. कदाचित हा मोबाईल फोन भारतात नंतर लॉन्च केला जात आहे. याआधी हा Honor V20 मोबाईल फोन या नावाने चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा भारतात लॉन्च होणार पहिला असा स्मार्टफोन असेल जो 48MP कॅमेरा सह लॉन्च केला जाणार आहे, तसेच यात तुम्हाला एक पंच होल डिस्प्ले पण मिळणार आहे.

सोबत फोन मध्ये लिंक टर्बो नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी पण दिली जाऊ शकते. जर Honor V20 मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर हा एक फ्लॅगशिप ग्रेड मोबाईल फोन आहे, जो Rs 35,000 किंवा Rs 45,000 मध्ये वेगवगेळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट सह भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर Honor View 20 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.4-इंचाचा एक HD+ ऑल-व्यू डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेच्या पिक्सल रेजोल्यूशन बद्दल बोलायचे तर हा जवळपास 2310×1080 पिक्सल आहे. तसेच याच्या डिस्प्ले वर तुम्हाला एक पंच होल पण मिळणार आहे, जो फ्रंट कॅमेऱ्यासह येणार आहे. हा सॅमसंगच्या इनफिनिटी O डिस्प्ले प्रमाणे आहे. तसेच फोनच्या बॅक बद्दल बोलायचे झाले तर याची मागील बाजू ग्लास ने कवर केला गेला आहे, जो तुम्हाला एका V-shape पॅटर्न मध्ये दिसणार आहे. हा V20 मोनिकर दाखवतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo