TENAA आणि FCC सर्टिफिकेशन साइट वर दिसला Honor V12 स्मार्टफोन
Honor V12 वेळे च्या खुप आधी या साइट्स वर दिसला असल्याचे संकेत मिळत आहेत की डिवाइस कंपनी नेहमीप्रमाणे आधी लॉन्च करू शकते.
Honor ने मागच्या वर्षी Honor View 10 च्या रुपात V10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोन मध्ये हाई-एंड स्पेसिफिकेशन्स होते. आता असे वाटते आहे की कंपनी या स्मार्टफोन ची जागा घेण्यासाठी पुढील स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे, कारण नवीन डिवाइस सर्टिफिकेशन साइट TENAA आणि FCC वर दिसला आहे. पण, लिस्टिंग नुसार, Honor एक जनरेशन सोडून V11 ऐवजी V12 लॉन्च करेल.
रिपोर्ट नुसार डिवाइस चीन च्या सर्टिफिकेशन साइट TENAA आणि अमेरिकेच्या वेबसाइट FCC वर दिसला आहे. Honor V10 बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस चीन मध्ये लॉन्च होण्याआधी हा पण या दोन्ही वेबसाइट्स वर दिसला होता. Honor V12 वेळे च्या खुप आधी या साइट्स वर दिसला असल्याचे संकेत मिळत आहेत की डिवाइस कंपनी नेहमीप्रमाणे आधी लॉन्च करू शकते.
डिवाइस च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही, पण TENAA ने आपली लिस्टिंग स्मार्टफोन च्या फोटो सह अपडेट केली आहे, ज्या वरून डिवाइस च्या डिजाइन ची माहिती मिळत आहे. Honor V12 च्या इमेज वरून वाटत आहे की डिवाइस मध्ये कोणतीही फॅन्सी डिजाइन नसेल. डिस्प्ले मध्ये कोणतेही नॉच नाही आणि बेजल्स पण खुप जाड आहेत. डिवाइस च्या बॅक ला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Honor V12 मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असू शकतो आणि या डिवाइस मध्ये 1,900mAh ची बॅटरी असू शकते. हे पण सांगण्यात आले आहे की फोन LTE, डुअल सिम आणि एंड्राइड ऑपरेटिंग सिस्टम ला सपोर्ट करेल. पण, सध्या हे डिटेल्स पूर्णपणे खरे समजणे थोडे घाईचे ठरू शकते, डिवाइस च्या लॉन्च च्या आधी याबद्दल इतर माहिती समोर येऊ शकते.