Honor 10 लॉन्च: आज जगभरात लॉन्च केला जाईल हा फोन, इथे बघू शकाल लाइव स्ट्रीमिंग

Honor 10 लॉन्च: आज जगभरात लॉन्च केला जाईल हा फोन, इथे बघू शकाल लाइव स्ट्रीमिंग
HIGHLIGHTS

Honor 10 स्मार्टफोन फ्लिप्कार्ट वरून एक्सक्लूसिव रित्या सेल करण्यात येणार आहे आणि याची खरी स्पर्धा 17 मे ला भारतात लॉन्च होणार्‍या OnePlus 6 स्मार्टफोन सोबत असणार आहे.

Honor आज जगभरात आपला नवीन स्मार्टफोन Honor 10 लॉन्च करणार आहे, हा डिवाइस मागच्या महिन्यात चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लॉन्च च्या आधी या स्मार्टफोन बद्दल माहिती समोर आली आहे की हा डिवाइस भारतात फ्लिप्कार्ट वरून सेल केला जाईल. या डिवाइस चा सेल 16 मे पासून सुरू होईल. 
Honor 10 बद्दल बोलायचे तर हा कंपनी चा एक मिड-रेंज डिवाइस असेल. पण तरीही यात तुम्हाला काही चांगले फीचरर्स मिळतील, पण याची किंमत Huawei P20 पेक्षा खुप कमी असेल. या डिवाइस ची टक्कर OnePlus च्या नव्या फ्लॅगशिप किलर डिवाइस म्हणजे OnePlus 6 सोबत होणार आहे. हा डिवाइस उद्या लंडन मध्ये होणार्‍या एका इवेंट मधुन जगभरात आणि 17 मे ला भारतात लॉन्च केला जाईल. 
Honor 10 लॉन्च: अशी बघू शकता या इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग
Honor 10 स्मार्टफोन आज Old Billings Gate वर एका इवेंट मधुन लॉन्च केला जाईल. याचा लॉन्च तुम्ही 2:00PM BST ला बघू शकता, म्हणजे तुम्ही हा भारतात जवळपास 6:15PM ला बघू शकता. हा इवेंट कंपनी आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनल वर लाइव स्ट्रीम करणार आहे. 
Honor 10: स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
स्पेक्स बद्दल बोलायचे तर हा डिवाइस कंपनी ने 5.84-इंचाच्या FHD+ LCD 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केले आहे. यात तुम्हाला नॉच डिजाईन पण मिळत आहे. फोन 6GB रॅम सह EMUI 8.1 वर आधारित एंड्राइड Oreo सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एक 3,400mAh क्षमता असलेली एक मोठी बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. 
फोन मध्ये एक 24-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 16-मेगापिक्सल चा एक सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. तसेच फोन मध्ये एक 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे तर याच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत CNY 2,599 आहे, जी जवळपास Rs 27,200 च्या आसपास आहे. त्याचप्रमाणे याचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट पाहता हा तुम्ही CNY 2,999 मध्ये घेऊ शकता. 
जी जवळपास Rs 31,400 च्या आसपास ची किंमत आहे. फोन चे हे स्पेक्स याच्या चीन मध्ये लॉन्च झालेल्या वर्जन चे आहेत, पण आज बघावे लागेल की याच्या ग्लोबल लॉन्च मध्ये याच्या स्पेक्स मध्ये काही बदल केला जातो की नाही ते. त्याचप्रमाणे याच्या भारतीय वेरिएंट मध्ये काय बादल होईल, हे आज लॉन्च नंतर समजेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo