आता ऑफलाइनसुद्धा उपलब्ध होणार हॉनर स्मार्टफोन

Updated on 24-Dec-2015
HIGHLIGHTS

हॉनरचे जे स्मार्टफोन ऑफलाइन मिळतील, त्यात हॉनर B, हॉनर 4C, हॉनर 4X, हॉनर 6 आणि हॉनर होली यांचा समावेश आहे. तर प्रीमियम विभागात कंपनीने हॉनर 6 प्लस आणि हॉनर 7 ला सुद्धा ऑफलाइन सादर केले आहे.

मोबाईल निर्माता कंपनी हुआवेचे हॉनर ब्रँड अंतर्गत येणारे स्मार्टफोन्स आता ऑफलाइनसुद्धा उपलब्ध होतील. आतापर्यंत हॉनरच्या अंतर्गत येणारे सर्व स्मार्टफोन्स फक्त ऑनलाइन उपलब्ध होते.

कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सला ऑफलाइन विकण्यासाठी जोपरशी भागेदारी केली आहे, ज्यानंतर ग्राहक ऑनलाइन स्मार्टफोनला ऑफलाइनसुद्धा अगदी सहजपणे खरेदी करु शकतील. आता हॉनर आणि जोपरच्या भागीदारीनंतर हॉनर स्मार्टफोन 267 आउटलेट्सवर उपलब्ध आहे, ज्यात दिल्ली, एनसीआर, गुडगाव आणि फरिदाबाद, चेन्नई, वल्लोर आणि बंगळूरु यांचा समावेश असेल. ह्या आउटलेट्सवर हॉनर प्रोडक्टसह ग्राहकांना काही खास ऑफर्स उपलब्ध होतील.

ह्या प्रोडक्टची किंमत तीच असेल जी, ऑनलाइन स्टोर्सवर उपलब्ध आहे. जसे हॉनर 4X ९,९९९ रुपयात उपलब्ध होईल. तर हॉनर 6 च्या दोन्ही काळ्या आणि पांढ-या रंगाची किंमत १४,९९९ रुपये असेल.

हॉनरचे जे स्मार्टफोन ऑफलाइन मिळतील, त्यात हॉनर B, हॉनर 4C, हॉनर 4X, हॉनर 6 आणि हॉनर होली यांचा समावेश आहे. तर प्रीमियम विभागात कंपनीने हॉनर 6 प्लस आणि हॉनर 7 ला सुद्धा ऑफलाइन सादर केले आहे.

हॉनर ब्रँड भारतात ऑक्टोबर 2014 मध्ये लाँच झाला होता. आतापर्यंत हॉनरच्या स्मार्टफोनला केवळ ऑनलाइन शॉपिंग साइट स्नेपडील आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी केले जाऊ शकत होते.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :