Honor ने मे महिन्यात Honor Play 40 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता ब्रँडने गुपचूपपणे Honor Play 40C नावाचा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. चला या स्मार्टफोन्सचे फीचर्स, स्पेसीफिकेशन्स आणि किंमत बघुयात.
Honor Play 40C फक्त एका 6GB RAM + 128GB व्हेरिएंटमध्ये येतो, ज्याची किंमत 899 युआन म्हणजेच अंदाजे 10,301 रुपये आहे. सध्या कंपनीने या स्मार्टफोनच्या ग्लोबल लाँच कोणतीही माहिती दिलेली नाही.
Honor Play 40C मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.56-इंच लांबीचा LCD वॉटरड्रॉप स्क्रीन आहे आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेटसह 6GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे. हे उपकरण Android 13 वर आधारित MagicOS 7.1 UI वर कार्य करेल.
याव्यतिरिक्त, यात हाय कॉलिटी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. मोठ्या 5200mAh बॅटरीसह 10W चार्जिंग सपोर्ट आहे. यासोबतच तुम्हाला ड्युअल सिम, 5G, Wi -Fi, ब्लूटूथ, GPS, NFC, USB-C पोर्ट, साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर इ. इतर फीचर्स देखील मिळतील.