Honor Note 10 स्मार्टफोन 30 ऑगस्ट ला केला जाऊ शकतो लॉन्च, कंपनी ने दिली माहिती

Updated on 20-Jul-2018
HIGHLIGHTS

Honor ने IFA 2018 इवेंट साठी मीडिया इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे, याचा अर्थ असा की Honor Note 10 डिवाइस याच इवेंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Honor Note 10 to launch in IFA 2018 on 30 August Media Invites Out: Huawei ने आपल्या Honor Note सीरीज मध्ये जवळपास मागील दोन वर्षांपासून कोणताही स्मार्टफोन लॉन्च केला नाही, पण आता कंपनी या सीरीज मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Honor Note 10 लॉन्च करणार आहे. या डिवाइस बद्दल इंटरनेट वर खुप माहिती समोर आली आहे. त्यातच आता एक नवीन बातमी या डिवाइस संबधी समोर येत आहे की हा IFA 2018 मध्ये 30 ऑगस्ट ला लॉन्च केला जाऊ शकतो. GSMArena च्या एका रिपोर्ट नुसार कंपनी ने IFA 2018 मध्ये होणार्‍या आपल्या एका इवेंट चे मीडिया इन्वाइट पाठवणे सुरू केले आहे. असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस किरिन 970 ओक्टा-कोर प्रोसेसर आणि AI क्षमते सह लॉन्च केला जाऊ शकतो. 

तुम्हाला माहितीच असेल कंपनी ने 2016 मध्ये आपला Honor Note 8 स्मार्टफोन लॉन्च केला होता, पण या नंतर कंपनी ने दोन वर्ष कोणताही डिवाइस या सीरीज मध्ये लॉन्च केला नाही आणि आपला Note 9 स्मार्टफोन या सीरीज मध्ये लॉन्च न करताच कंपनी ने डायरेक्ट आपला Honor Note 10 स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी केली आहे. 

विशेष म्हणजे पहिल्यांदाच या डिवाइस बद्दल काही समोर आलेले नाही, या आधी या डिवाइस बद्दल खुप काही समोर आले आहे. आता पर्यंत आलेल्या लीक इत्यादी वरून समजले आहे की हा खुप स्लिम असेल, तसेच याच्या स्क्रीन जवळचे बेजल्स पण खुप नैरो असतील. या खुपच थिन बेजल्स मुळे या आगामी स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6.9-इंचाचा डिस्प्ले मिळेल. आपण असेही म्हणू शकतो की Honor Note 10 एक उत्तम दिसणारा डिवाइस असेल, जो तुम्हाला आकर्षित करू शकतो. 
या डिवाइस बद्दल अशी माहिती या आधी पण समोर आली आहे. Weibo वर अधिकृत honor.cn वेबसाइट चे काही स्क्रीनशॉट्स दिसले होते. लीक्ड स्क्रीनशॉट्स वरून डिवाइस च्या डिजाइन आणि स्पेक्स बद्दल खुप माहिती मिळाली आहे. 

नवीन फोटो वरून समजते की Honor Note 10 चा 6.9 इंचाचा AMOLED डिस्प्ले 2K रेजोल्यूशन ला सपोर्ट करेल. डिवाइस मध्ये किरिन 970 SoC असेल. ग्राफिक परफॉरमेंस वाढवण्यासाठी हँडसेट हुवावे च्या GPU टर्बो टेक्नोलॉजी सह येईल. 
Honor Note 10 मध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असेल. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 16 मेगापिक्सल चा AI डुअल कॅमेरा असेल. डिवाइस मध्ये 6,000mAh ची बॅटरी असेल जी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :