5,000mAh बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह चीन मध्ये लॉन्च झाला Honor Note 10
Honor Note 10 चीन मध्ये तिन वेरिएन्ट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि हा डिवाइस उद्या म्हणजे 1 ऑगस्ट पासून चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
Huawei च्या सब-ब्रांड Honor ने चीन मध्ये आपला Note 10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Note 10 मध्ये 6.9 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याचे रेजोल्यूशन 2160×1080 आहे आणि जो 18:9 एस्पेक्ट रेश्यो सह येतो आणि HDR10 फॉर्मेट ला सपोर्ट करते. या स्मार्टफोन मध्ये किरिन 970 ओक्टा-कोर चिपसेट, माली G72 GPU आणि i7 को-प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये GPU टर्बो टेक, CPU टर्बो टेक आणि डबल टर्बो मोड देण्यात आला आहे जे उत्तम परफॉरमेंस देऊ शकतात. हे मोड्स ऑन करण्यासाठी एक डेडिकेटेड हार्डवेयर बटन पण देण्यात आला आहे.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या बॅकला डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात एक 24 मेगापिक्सल चा प्राइमरी सेंसर आणि दुसरा 16 मेगापिक्सल चा सेकेंडरी सेंसर आहे जो AI पॉवर्ड सीन रेकोग्निशन सह येतो. सेल्फी साठी डिवाइस च्या फ्रंट ला 13 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे.
डिवाइस मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी ला सपोर्ट करते. कनेक्टिविटी साठी हा फोन डुअल-सिम कार्ड स्लॉट, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 4.2 LE, GPS, NFC आणि USB टाइप-C सोबत येतो. सॉफ्टवेयर बद्दल बोलायचे तर डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित EMUI 8.2 वर चालतो.
Honor Note 10 चीन मध्ये तिन वेरिएन्ट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत RMB 2,799 (जवळपास 28,100 रूपये), 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत RMB 3,199 (जवळपास 32,100 रूपये) ठेवण्यात आली आहे आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट RMB 3,599 (जवळपास 36,100 रूपये) मध्ये विकत घेता येईल. डिवाइस चा सेल चीन मध्ये 1 ऑगस्ट पासून सुरू होईल.