प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Honor चा नवा Honor Magic 6 Pro भारतात लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजेच 180MP कॅमेरासह भारतीय बाजारपेठेत लाँच होणार हा पहिला स्मार्टफोन आहे. यासह, या फोनमध्ये अनेक पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स लाँच करण्यात आले आहेत. या Honor Magic 6 Pro फोनच्या आगमनाने Samsung, Xiaomi आणि Vivo सारख्या स्मार्टफोन ब्रँडच्या फोन्सना जबरदस्त स्पर्धा मिळणार आहे. जाणून घेऊयात Honor Magic 6 Pro फोनची किंमत आणि सर्व तपशील.
लेटेस्ट Honor Magic 6 Pro ची किंमत 89,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या किमतीत फोनचे 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट मिळणार आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 15 ऑगस्ट 2024 पासून भारतात सुरू होणार आहे. हे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वरून खरेदी करू शकता. Honor Magic 6 Pro फोन Epic Green आणि Black कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Honor Magic 6 Pro मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह मोठा 6.80-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या डिव्हाइसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. यात 12GB RAM आणि 512TB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR Vivid साठीही सपोर्ट मिळाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मोबाइल फोन Android 14 MagicOS 8.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा दिली आहे.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Honor ने या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 180MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, हा फोन 5600mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. ज्यासह 80W फास्ट चार्जिंग आणि 66W वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.