Honor 9N भारतात 24 जुलै ला केला जाऊ शकतो लॉन्च, कंपनी ने ट्विट केला टीजर
कंपनी ने शेयर केलेल्या विडियो टीजर मधून समोर येत आहे की हा डिवाइस ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाऊ शकतो.
Honor 9N Smartphone to Launch in 24 July in India: Honor India ने आपल्या ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून एक ट्विट करून कंपनी चा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. असे समोर येत आहे की Honor 9N स्मार्टफोन कंपनी 24 July ला भारतात लॉन्च करू शकते. या विडियो टीजर मध्ये तुम्हाला एक कॅप्शन दिसेल, ज्यात लिहिण्यात आले आहे, तयार व्हा याआधी कधीही न पाहिलेला डिवाइस बघण्यासाठी. त्यापुढे कंपनी ने एका ग्रँड लॉन्च इवेंट चा उल्लेख पण केला आहे.
हि माहिती त्याच वेळी समोर आली, जेव्हा कंपनी ने आपल्या एका आगामी डिवाइस बद्दल मीडिया इनवाइट पठावायला सुरवात केली होती आणि सोशल मीडिया वर याची माहिती द्यायला पण सुरवात केली होती.
पण असे बोलले जात होते की आपल्या लॉन्च इवेंट मध्ये कंपनी आपला Honor 9X स्मार्टफोन लॉन्च करेल. पण असे झाले नाही, आता समोर येत आहे की कंपनी आपला Honor 9N स्मार्टफोन लॉन्च करू शकते. एक चर्चा अशी पण सुरु आहे की हा डिवाइस कंपनी च्या Honor 9i (2018) चा एक रीब्रांड वर्जन असू शकतो. Honor 9i चीन मध्ये मागच्या महिन्यात लॉन्च करण्यात आला होता.
या डिवाइस च्या स्पेक्स बद्दल बोलायचे तर या Honor 9N स्मार्टफोन ला Honor 9i (2018) चा एक सिंपल रीब्रांड म्हणू शकतो. Honor 9N स्मार्टफोन एक 5.84-इंचाच्या FHD+ 2280×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह लॉन्च केला जाऊ शकतो, त्याचबरोबर यात एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन असेल.
Honor 9N मध्ये तुम्हाला एक Kirin 659 चिपसेट मिळू शकते, सोबतच 4GB रॅम यात मिळू शकतो. फोन मध्ये GPU Turbo टेक्निक पण असू शकते. हा डिवाइस कंपनी दोन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. हा 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण जर तुम्हाला ही स्टोरेज वाढवायची असेल तर तुम्ही ही माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकता.