Honor 9N 128 वेरिएंट आज पासून ऑफलाइन झाला उपलब्ध, सर्व क्रोमा स्टोर्स मधून घेता येईल विकत

Updated on 01-Aug-2018
HIGHLIGHTS

Honor 9N स्मार्टफोन आता ऑनलाइन सोबतच ऑफलाइन पण उपलब्ध करण्यात आला आहे, आज म्हणजे 1 ऑगस्ट पासून तुम्ही हा डिवाइस सर्व क्रोमा ऑफलाइन स्टोर्स मधून विकत घेऊ शकता.

Honor 9N स्मार्टफोन आता ऑनलाइन सोबतच ऑफलाइन पण उपलब्ध करण्यात आला आहे, आज म्हणजे 1 ऑगस्ट पासून तुम्ही हा डिवाइस सर्व क्रोमा ऑफलाइन स्टोर्स मधून विकत घेऊ शकता. पण फक्त 128GB वेरिएंट ऑफलाइन बाजारात येईल. हा डिवाइस तुम्ही क्रोमा स्टोर्स मधून फक्त Rs 17,999 मध्ये विकत घेऊ शकता. तसेच तुम्ही हा डिवाइस क्रोमा च्या ऑनलाइन पोर्टल वरून पण घेऊ शकता. पण मग तुम्हाला 3 तास वाट बघावी लागेल. म्हणजे तुमच्यापर्यंत हा फोन 3 तासांमध्ये पोहोचवला जाईल. 

तुम्हाला तर माहित आहे हा डिवाइस एक ऑनलाइन एक्सक्लूसिव डिवाइस म्हणून लॉन्च करण्यात आला होता, आणि हा अनेकदा फ्लिपकार्ट वर सेल साठी आला आहे, विशेष म्हणजे कालच हा डिवाइस फ्लिपकार्ट वर सेल साठी आला होता. 

या डिवाइस च्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे तर Honor 9N स्मार्टफोन एका 5.84-इंचाच्या FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, सोबतच यात ओक्टा-कोर हाईसिलिकॉन Kirin 659 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला 4GB रॅम मिळत आहे. तसेच स्टोरेज मध्ये वेगवेगळे वेरिएंट उपलब्ध आहेत. 

Honor 9N मधील कॅमेरा बद्दल बोलायाचे तर हा डिवाइस तुम्ही 13+2-मेगापिक्सल च्या ड्यूल रियर कॅमेरा सेटअप सह घेऊ शकाल. त्याबरोबर तुम्हाला LED फ्लॅश पण मिळत आहे. तसेच तुम्हाला एक 16-मेगापिक्सल चा 2.0µm pixel sensor size वाला सेल्फी कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे, सोबतच यात एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. फोन एंड्राइड 8.0 Oreo वर आधारित EMUI 8.0 वर चालतो. यात एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :