digit zero1 awards

Honor 90 5G Sale Offers: नुकतेच लाँच झालेल्या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु, थेट 5,000 रुपयांची सूट उपलब्ध

Honor 90 5G Sale Offers: नुकतेच लाँच झालेल्या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु, थेट 5,000 रुपयांची सूट उपलब्ध
HIGHLIGHTS

HTech ने Honor 90 5G स्मार्टफोनसह भारतात कमबॅक

जे ग्राहक पहिल्या सेलमध्ये Honor चा हा नवीन फोन खरेदी करतील, त्यांना 5000 रुपयांची सवलत मिळेल.

SBI बँक क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांद्वारे 3000 रुपयांची सूट

गेल्या आठवड्यात HTech ने Honor 90 5G स्मार्टफोनसह भारतात कमबॅक केला आहे. लाँन्चच्या वेळी फोनच्या सेलबद्दल घोषणा करण्यात आली होती, हे उपकरण आजपासून देशात खरेदीसाठी उपलब्ध होईल. जर तुम्ही देखील Honor 90 5G खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या स्मार्टफोन्सबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात. 

सर्वप्रथम, हे डिवाइस आज दुपारी 12 वाजल्यापासून Amazon आणि ऑफलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन Diamond Silver, Emerald Green आणि Midnight Black  शेडमध्ये खरेदी करता येईल.

Honor 90 5G ची किंमत 

Honor 90 5G भारतात 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 512GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या दोन मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 37,999 रुपये आणि 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

honor 90 5g

Honor 90 5G  पहिल्या सेलमधील ऑफर्स 

बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही येथे मोठी सूट मिळणार आहे. Honor 90 5G वर ICICI किंवा SBI बँक क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांद्वारे 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. याशिवाय, जर तुम्हाला जुना किंवा विद्यमान एक्सचेंज करायचा असेल तर, येथे 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल. याशिवाय, महत्त्वाचे म्हणज जे ग्राहक पहिल्या सेलमध्ये Honor चा हा नवीन फोन खरेदी करतील, त्यांना 5000 रुपयांची सवलत मिळेल.

भारतात Honor 90 5G च्या लॉन्च इव्हेंट दरम्यान घोषित केलेल्या Honor Choice TWS च्या जागी ही 5,000 रुपयांची सूट दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक बजाज फिनसर्व्ह कार्ड वापरून 9 महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI देखील निवडू शकतात. Buy from here 

Honor 90 5G तपशील

Honor 90 5G स्मार्टफोन 6.7-इं लांबीच्या क्वाड-कर्व AMOLED डिस्प्लेसह येतो, जो 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. Honor 90 5G स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेट देण्यात आली आहे. Snapdragon 7 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म हे तुमचे एकूण गेमिंग पॅकेज आहे. हा प्लॅटफॉर्म हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, तसेच हार्ट-पंपिंग ऑडिओ आणि व्हिज्युअलसह एपिक मोबाइल गेमिंग प्रदान करतो. 

 आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. या बॅटरीसह फोन बेसिक कामांसह दोन दिवस चालेल. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या सह तुम्ही ट्रू-टू-लाईफ इमेजेस कॅप्चर करू शकता. आणि मागील पॅनलवर 200MP OIS कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत. हे उपकरण Android 13 वर आधारित MagicOS 7.1 वर चालते आणि सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo