digit zero1 awards

जबरदस्त 200MP कॅमेरासह Honor 90 5G हा Latest स्मार्टफोन ऑफलाइन खरेदीसाठी उपलब्ध, ‘या’ ठिकाणी खरेदी करा 

जबरदस्त 200MP कॅमेरासह Honor 90 5G हा Latest स्मार्टफोन ऑफलाइन खरेदीसाठी उपलब्ध, ‘या’ ठिकाणी खरेदी करा 
HIGHLIGHTS

Honor ब्रँडने रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी केली आहे.

हा मिड रेंज फोन तब्बल 200MP कॅमेरा सारख्या आकर्षक फीचर्ससह येतो.

ग्राहक रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून Honor स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Honor ने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनसह भारतात जबरदस्त कमबॅक केला आहे. होय, कंपनीने नवीन स्मार्टफोन Honor 90 5G सह भारतात पुनरागमन केले आहे. हा मिड रेंज फोन तब्बल 200MP कॅमेरा सारख्या आकर्षक फीचर्ससह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्रँडने रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी केली आहे. म्हणजेच तुम्ही आता त्यांच्या भौतिक स्टोअरमधून Honor स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनीच्या या हालचालीमुळे नवीन उपकरणाची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा: Amazon Sale 2023: स्वस्त ते महाग अशा प्रत्येक बजेटमधील सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच, Best डील्स बघा, त्वरा करा!

Honor 90 5G

Honor 90 5G ची भारतीय किंमत

Honor 90 5G आतापर्यंत फक्त ऑनलाइन खरेदी करता येत होते. Honor 90 ची सध्या 8GB RAM + 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत 37,999 रुपये आहे, तर 12GB RAM + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत 39,999 रुपये आहे. आता फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या रिलायन्स डिजिटल स्टोअरला भेट देऊ शकतात.

Honor 90

Honor चा हा स्मार्टफोन अतिशय मजबूत फीचर्ससह येतो. यात 6.7-इंच लांबीचा क्वाड कर्व फ्लोटिंग AMOLED डिस्प्ले आहे, जो 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट इ. ऑफर करतो. त्याबरोबरच, कार्यक्षमतेसाठी Snapdragon 7 Gen 1 Accelerated Edition चिपसेटसह सुसज्ज आहे. हा फोन 512GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 12MP वाइड-एंगल कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि जागतिक दर्जाचा 200MP मुख्य सेन्सर समाविष्ट आहे. फोनच्या पुढील बाजूस AI Vlog 2.0 सह 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

यात 5000mAh बॅटरी आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेट सिंगल स्पीकर, USB टाइप-C कनेक्टिव्हिटीसह येतो आणि मॅजिकओएस 7.1 वर कार्य करतो, जो Android 13 वर आधारित आहे. हा हँडसेट सुरक्षेसाठी ब्लूटूथ 5.2 आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील देतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo