मागील काही काळापासून Honor कंपनीची भारतात पुनरागमनाची चर्चा टेक विश्वात सुरु आहे. अखेर कंपनीने नवा Honor 90 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच केला आहे. नवीनतम स्मार्टफोनसह या कंपनीने भारतात जबरदस्त कमबॅक केला आहे. कंपनी तब्बल तीन वर्षांनंतर या फोनसह भारतात पुनरागमन करत आहे.
या स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या माध्यमातून केली जाणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 200MP मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. Amazon पेजवर दिलेल्या टीज व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले होते की, हा फोन 200MP मुख्य कॅमेरासह येईल आणि त्यात क्वाड कर्व डिस्प्ले असेल, ज्याची कमाल ब्राइटनेस 1400 nits आहे.
Honor 90 5G भारतात 8GB रॅम आणि 256GB व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये आणि 12GB रॅम आणि 512GB व्हेरिएंटसाठी 29,999 रुपयांच्या किमतीत लाँच झाला आहे. Honor 90 5G देखील ICICI आणि SBI बँक कार्डवर 3000 रुपयांचा झटपट सवलतीसह सेलमध्ये येणार आहे. स्मार्टफोनची विक्री केवळ Amazon वर केली जाईल.
कंपनीने हा स्मार्टफोन आधीच चिनी मार्केटमध्ये लाँच केला आहे. भारतातही हा स्मार्टफोन समान स्पेसिफिकेशन्ससह सादर केला गेला आहे. फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1200 x 2664 आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर MagicOS 7.1 वर चालतो.
या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen1 प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर हाय परफॉर्मन्स, पॉवर इफिसीएन्सी, क्विक चार्ज आणि स्नॅपड्रॅगन एलाईट गेमिंग सारखी ऍडव्हान्स फीचर्स ऑफर करतो. यात 16GB रॅमसह 512GB स्टोरेज आहे. यात 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी वेब सर्फिंगसारख्या मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकू शकते. हे 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याबरोबरच, यात 5W रिवर्स चार्जिंग देखील उपलब्ध आहे.
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, Honor 90 5G मागील बाजूस 200-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबतच, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेलचा सेन्सर पुढच्या बाजूला देण्यात आला आहे.