digit zero1 awards

Limited Time Deal! अलीकडेच लाँच झालेल्या Honor 90 वर ऑफर्सचा वर्षाव सुरु, बंपर Discount सह स्वस्तात खरेदी करा

Limited Time Deal! अलीकडेच लाँच झालेल्या Honor 90 वर ऑफर्सचा वर्षाव सुरु, बंपर Discount सह स्वस्तात खरेदी करा
HIGHLIGHTS

Honor कंपनीने Honor Days सेल सुरू केला आहे.

Honor ने सप्टेंबर महिन्यात Honor 90 5G सम्मार्टफोन लाँच केला होता.

ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची अतिरिक्त सूट

Honor ने सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारात जबरदस्त पुनरागमन केले. होय, कंपनीच्या Honor 90 स्मार्टफोनने लाँच होताच जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर फेस्टिवल सेल्समध्ये अनेक वापरकर्त्यांनी Amazon वरून हा स्मार्टफोन ऑफर्ससह आधीच खरेदी केला आहे. पण ज्यांना हा स्मार्टफोन फेस्टिवल सेलमध्ये खरेदी करण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी निराश होऊ नका, कारण आता कंपनीने Honor Days सेल सुरू केला आहे.

होय, Honor Days सेल अंतर्गत हा स्मार्टफोन आणखी कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि ऑफर्स बघुयात.

Honor 90 5G IN AMAZON SALE

हे सुद्धा वाचा: Realme C67 5G: Realme चा सर्वात स्लिम Affordable 5G फोनची भारतीय लाँच डेट जाहीर, बघा डिटेल्स। Tech News

Honor 90 वरील ऑफर्स

लक्षात घ्या की, Honor Days सेल 8 केवळ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत लाईव्ह असणार आहे. ऑफरसह, HONOR 90 5G फोनचे 8RAM + 256GB स्टोरेज फक्त 31,999 रुपयांना मिळू शकते. तर, या फोनचा टॉप मॉडेल 12RAM + 512GB स्टोरेज 33,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. Honor Days सेल दरम्यान, HONOR 90 फोनवर 3000 रुपयांची आकर्षक सवलत आहे.

एवढेच नाही तर इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. कंपनी फोन खरेदी करताना 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI देखील ऑफर करत आहे.

Honor 90 5G

Honor 90 मध्ये 6.7 इंच लांबीचा 1.5K क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्मार्टफोनमधील वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट उपलब्ध आहे. डेटा जतन करण्यासाठी यात 12GB पर्यंत रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात 7GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट आहे, म्हणजेच तुम्हाला फोनमध्ये एकूण 19GB पर्यंत रॅम मिळेल.

फोटोग्राफीसाठी Honor 90 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 200MP प्रायमरी, 12MP अल्ट्रा वाईड अँगल आणि 2MP डेप्थ लेन्स उपलब्ध आहेत. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 66W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचे सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo