डुअल फ्रंट आणि रियर कॅमेरा असलेला Honor 9 Lite आज होईल सेल साठी उपलब्ध
Honor 9 Lite मध्ये ग्लास बॅक आहे, जो वेगळा लुक देतो. या बजेट मधील खुपच कमी फोंस मध्ये ग्लास बॅक मिळतो.
Honor 9 Lite मध्ये डुअल रियर आणि डुअल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. सोबतच यात फुल व्यू डिस्प्ले पण आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण आज दुपारी 12 वाजता हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. याच्या 3GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. 10,999 आहे. तर याच्या 4GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. 14,999 आहे.
या स्मार्टफोन मध्ये रियर ग्लास पॅनल आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या Honor 9 Lite मध्ये 5.65 इंचाचा फुल HD+ IPS डिस्प्ले आणि 18:9 एस्पेक्ट रेशियो आहे.
यात Kirin 659 चिपसेट आहे. या डिवाइस मध्ये 3000mAh ची बॅटरी आणि एंड्रॉयड 8.0 Oreo आहे. हा डुअल सिम डिवाइस आहे आणि यात फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइडला आहे.
Honor 9 Lite स्मार्टफोन मध्ये 13MP + 2MP चा डुअल फ्रंट आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. कनेक्टिविटी साठी यात GPS, A-GPS, VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, माइक्रो USB पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक आहे.