Huawei कडून काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आलेला Honor 9 Lite स्मार्टफोन एकदा पुन्हा आज दुपारी 12 वाजता सेल साठी Flipkart वर उपलब्ध होणार आहे. हा
स्मार्टफोन लॉन्च नंतर खुपदा सेल साठी आलेला आहे आणि प्रत्येक सेल मध्ये काही मिनिटांत हा स्मार्टफोन सोल्ड आउट होतो. आज च्या सेल मध्ये काय होणार हे तर तुम्हाला समजेल. हा स्मार्टफोन भारतात जानेवारी मध्ये लॉन्च केला गेला होता.
या स्मार्टफोन ची सर्वात मोठी खासियत हा मिड-रेंज मध्ये येऊन ही यात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत यातील फेस अनलॉक फीचर, सर्वांना आकर्षित करतो. हेच कारण आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन सेल साठी आल्यानंतर काही मिनिटांत हा सोल्ड आउट होतो. मागच्याच आठवड्यात कंपनी ने या स्मार्टफोन ला एक OTA अपडेट च्या माध्यमातून राइड मोड फीचर दिला आहे. हा तुम्हाला त्यावेळेस उपयोगी ठरेल जेव्हा तुम्ही दुचाकी वाहन चालवत असाल. हा फीचर मार्च एंड पर्यंत सर्व स्मार्टफोंस मध्ये मिळायला सुरवात होईल.
Honor 9 Lite स्मार्टफोन च्या फीचर्स आणि स्पेक्स बद्दल बोलायाचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.65-इंचाचा FHD+ 2160×1080 पिक्सेल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. ही स्क्रीन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येईल. स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर किरिन 650 CPU देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन सह एक 4GB रॅम व्यतिरिक्त एक 64GB इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट पण मिळत आहे.
स्मार्टफोन चा सर्वात खास फीचर याचा क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. यात एक 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा सेटअप फोन च्या फ्रंट आणि रियर बाजूस आहे. या दोन्ही कॅमेरांच्या मदतीने तुम्ही 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला पोर्ट्रेट मोड वाला विडियो रेकॉर्ड करू शकता.
फोन ला एंड्राइड 8.0 Oreo सह लॉन्च करण्यात आले आहे, तसेच यात एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. फोन ब्लॅक, ब्लू, ग्रे रंगात घेतला जाऊ शकतो. या स्मार्टफोन च्या 3GB रॅम वाल्या वर्जन ची किंमत Rs. 10,999 आहे, तसेच याच्या 4GB रॅम वाल्या वर्जन ची किंमत Rs. 14,999 आहे.