Honor 8X ची विक्री 24 ऑक्टोबरला अमेझॉन वर होईल सुरु, किंमत Rs 14,999

Updated on 22-Oct-2018
HIGHLIGHTS

Honor 8X मोबाईल फोन कंपनी ने Rs 14,999 च्या बेस किंमतीती लॉन्च केला आहे आणि याच्या टॉप वेरीएंटची किंमत Rs 18,999 ठेवण्यात आली आहे.

हुवावे च्या सब-ब्रांड ऑनर ने गेल्या आठवड्यात आपला नवीन मोबाईल फोन Honor 8X लॉन्च केला होता जो मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या Honor 7X ची जागा घेईल. या नवीन मोबाईल फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफार्म अमेझॉन इंडिया वर सुरु होईल आणि हा सेल 24 ऑक्टोबर पासून सुरु होईल. लॉन्च ऑफर मध्ये एयरटेल यूजर्सना 1TB 4G डेटा मिळू शकतो. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो एंड्राइड ओरियो ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित EMUI 8.2 वर चालतो.

Honor 8X चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Honor 8X मोबाईल मध्ये एक 6.5-इंचाचा FHD+ TFT IPS नॉच डिस्प्ले मिळत आहे, जो 1080×2340 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. फोन मध्ये ओक्टा-कोर हीसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो कंपनीच्या GPU टर्बो टेक सह आला आहे. यावतिरिक्त यात तुम्हाला दोन स्टोरेज आणि रॅम वेरीएंट मिळत आहे.

हा डिवाइस तुम्ही 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह घेऊ शकता. तसेच यात तुम्हाला 6GB रॅम पण मिळत आहे, या रॅम वेरीएंट मध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे स्टोरेज वेरीएंट पण मिळत आहेत. तुम्ही हा 64GB आणि 128GB स्टोरेज मध्ये घेऊ शकता. हि स्टोरेज तुम्ही वाढवू पण शकता. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो, सोबतच यात 3,750mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.

फोन मधील कॅमेरा इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत हाये. जो 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा एक कॅमेरा कॉम्बो आहे. याच्या कॅमेरा सोबत तुम्हाला LED फ्लॅश पण मिळत आहे. फोन मध्ये एक 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला 3.5mm चा ऑडियो जॅक पण मिळत आहे.

Honor 8X ची किंमत

Honor 8X मोबाईल फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जन फक्त Rs 14,999 मध्ये घेता येईल,तसेच याचा 6GB रॅम वेरीएंट आणि 64GB किंवा 128GB स्टोरेज वेरीएंट क्रमश: Rs 16,999 आणि Rs 18,999 मध्ये तुम्ही घेऊ शकता. फोन ब्लॅक, ब्लू, आणि रेड कलर वेरीएंट्स मध्ये घेतला जाऊ शकतो आणि हा तुम्ही अमेझॉन इंडिया वर होणाऱ्या 24 ऑक्टोबरच्या सेल मध्ये घेऊ शकता.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :