Honor 8X स्मार्टफोन ड्यूल 4G सपोर्ट आणि स्लो-मोशन रिकॉर्डिंग सह लॉन्च

Updated on 06-Sep-2018
HIGHLIGHTS

Honor ने अखेरीस आपल्या Honor 7X जेनरेशनचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा डिवाइस Honor 8X म्हणून लॉन्च करण्यात आला आहे.

Honor ने अखेरीस आपल्या Honor 7X जेनरेशनचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा डिवाइस Honor 8X म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. पण Honor 8X स्मार्टफोन मध्ये आधीपेक्षा डिजाईन पासून हार्डवेयर पर्यंत आणि कॅमेरा पासून बॅटरी पर्यंत सर्व स्पेक्स आणि फीचर्स मध्ये बदल झाला आहे. त्याचबरोबर कंपनी ने आपला अजून एक स्मार्टफोन Honor 8X Max म्हणून लॉन्च केला आहे. हा स्नॅपड्रॅगन चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. असे वाटते आहे की Honor 8X Max स्मार्टफोन Xiaomi च्या Mi Max लाइनअपला टक्कर देण्यासाठी बाजारात आणण्यात आला आहे. Honor 8X स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एक ग्लास बिल्ड सह लॉन्च झाला आहे, ज्यात Kirin 710 चिपसेट सह 3750mAh क्षमता असलेली बॅटरी आहे आणि यात तुम्हाला स्लो-मोशन विडियो रिकॉर्डिंग पण देण्यात आली आहे. 

Honor 8X चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
Honor 8X एक मिड-रेंज स्मार्टफोन आहे. हा डिवाइस Xiaomi Mi A2 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन तसेच Nokia 6.1 Plus स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला एक 6.5-इंचाचा एक FHD+ डिस्प्ले मिळत आहे, हा एक 18.7:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. यात तुम्हाला किरिन 710 मिड-रेंज प्रोसेसर मिळत आहे. 

फोन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रॅम सोबत वेगवेगळे स्टोरेज वेरिएंट पण मिळतील, हा डिवाइस तुम्ही 4GB/6GB रॅम सोबत 32GB/64GB/128GB स्टोरेज वेरिएंट मध्ये घेऊ शकता. तसेच ही स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 128GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये एक 20-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळत आहे, सोबतच यात एक 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कमेरा पण आहे. फोन मध्ये एक 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे. 

Honor 8X स्मार्टफोन मध्ये एक 3750mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जिच्या मध्ये फास्ट चार्जिंग आहे. फोन मध्ये GPU Turbo टेक्नॉलजी पण देण्यात आली आहे, ज्यामुळे गेमिंग परफॉरमेंस मध्ये सुधार होतो. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये ड्यूल 4G, वाई-फाई 80.11 ac, ब्लूटूथ 5.0, GPS आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. 

Honor 8X ची किंमत आणि उपलब्धता 
भारतात हा डिवाइस अजूनतरी लॉन्च करण्यात आला नाही, पण असे बोलले जात आहे की हा भारतात येत्या महिन्यात किंवा त्यानंतर काही दिवसांनी लॉन्च केला जाऊ शकतो. भारतात याची किंमत Rs 14,999 असण्याची शक्यता आहे. साध्यतरी हा डिवाइस चीन मध्ये उपलब्ध झाला आहे आणि तिथे हा ब्लॅक, ब्लू, रेड आणि पर्पल रंगांत घेता येईल. याची किंमत पाहता हा तुम्ही 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मध्ये 1399 युआन म्हणजे जवळपास Rs 14,433 आणि 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज 1599 युआन म्हणजे जवळपास Rs 16,490 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, तसेच याचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 1899 युआन म्हणजे जवळपास Rs 19,591 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :