Honor 8X आणि 8X Max बेजल-लेस डिस्प्ले आणि 90 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतील

Honor 8X आणि 8X Max बेजल-लेस डिस्प्ले आणि 90 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतील
HIGHLIGHTS

Honor 8X आणि 8X Max 5 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च केले जातील, लॉन्चच्या आधीच डिवाइस चे अनेक स्पेक्स आणि फीचर्स समोर आले आहेत.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले Honor 8X सीरीज चे स्मार्टफोन्स उद्या म्हणजे 5 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च केले जातील. लॉन्च च्या एक दिवस आधी पण लीक्स आणि टिजर्स येत आहेत. Weibo वर दिसलेल्या लेटेस्ट टीजर याचा खुलासा करत आहे की Honor 8X आणि Honor 8X Max स्मार्टफोन्स बेजल-लेस स्क्रीन्स सह येतील. 

Honor च्या Weibo अकाउंट वर दिसलेला नवीन टीजर वीडियो सुचवत आहे की Honor 8X आणि 8X Max चा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90 टक्के असेल. आधीच्या लीक्स वरून पण या आगामी डिवाइसेज मध्ये मोठा डिस्प्ले असण्याचे संकेत मिळाले होते. Honor 8X मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असु शकतो, तसेच 8X Max एका 7.12 इंचाच्या मोठया स्क्रीन सह येऊ शकतो. दोन्ही डिस्प्ले फुल HD+ रेजोल्यूशन वाले असतील ज्यांचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 असेल आणि याच्या वरच्या बाजूला एक छोटा नॉच असेल. 

Honor 8X
काही दिवसांपूर्वी Honor 8X TENAA वर दिसला होता आणि या लिस्टिंग मधून डिवाइस च्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स ची माहिती मिळाली होती. स्मार्टफोन मध्ये FHD+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट, 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 

त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये 20 आणि 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल तसेच डिवाइस मध्ये 3,650mAh ची बॅटरी असेल आणि एंड्राइड 8.1 ओरियो वर चालेल. 

Honor 8X Max
Honor 8X Max मध्ये फुल HD+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 660 SoC आणि 8X सारखे मेमरी पर्याय उपलब्ध असतील. या डिवाइस मध्ये 16 आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप देण्यात येईल आणि याच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. तसेच डिवाइस मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट-चार्जिंग सपोर्ट सह येईल. 

टीजर वर विश्वास ठेवल्यास Honor या दोन्ही स्मार्टफोंस व्यतिरिक्त अजून एक प्रोडक्ट Honor Band 4 पण लॉन्च करू शकते.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo