Honor 8C मोबाईल फोन आज भारतात लॉन्च केला जाणार आहे, विशेष म्हणजे हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 632 सह लॉन्च केला जाऊ शकतो, आणि हा अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिवली सेल केला जाणार आहे.
आज हॉनर भारतात आपल्या Honor 7C मोबाईल फोनच्या पिढीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, हा नवीन मोबाईल फोन भारतात Honor 8C नावाने लॉन्च केला जाणार आहे. याची किंमत पाहता अधिकृतपणे याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही पण अंदाज लावला जात आहे कि हा मोबाईल फोन Rs 10,000 ते Rs 15,000 च्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. जर तुम्ही हा फोन लाइव लॉन्च होताना बघू इच्छित असाल तर तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेल्स वर जाऊन बघू शकता.
हा मोबाईल फोन आज दुपारी 12 वाजता एक अमेझॉन इंडिया एक्सक्लूसिव प्रोडक्ट म्हणून लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट व्यतिरिक्त एक 13MP चा ड्यूल AI कॅमेरा सेटअप मिळू शकतो, तसेच यात तुम्हाला एक 4000mAh क्षमता असलेल्या बॅटरी व्यतिरिक्त भरपूर काही मिळेल.
काही स्पेक्सची चर्चा करायची झालीच तर असे बोलले जात आहे कि Honor 8C मोबाईल फोन भारतात एका नॉच डिजाईन सोबत मेटल यूनीबॉडी सह लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच फोन मध्ये एक 6.26-इंचाचा HD+ डिस्प्ले 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह असण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट मिळणार आहे, ज्यमुळे हा पहिला असा डिवाइस असणार आहे, जो या चिपसेट सह लॉन्च होईल. फोन मध्ये तुम्हाला 4GB च्या रॅम व्यतिरिक्त 32GB आणि 64GB ची स्टोरेज पण मिळणार आहे. फोन मध्ये एक 4000mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे.