Honor 8C मोबाईल फोन स्नॅपड्रॅगॉन 632आणि नॉच डिस्प्ले सह भारतात या दिवशी होऊ शकता लॉन्च
असे बोलले जात आहे कि पुढल्या आठवड्यात भारतात Huawei चा सब-ब्रँड Honor त्यांचा Honor 8C मोबाईल फोन लॉन्च करू शकतो. या डिवाइस मध्ये तुम्हाला आकर्षक किंमतीती चांगले हार्डवेयर स्पेक्स मिळणार आहे.
असे समोर येत आहे कि Huawei चा सब-ब्रँड Honor त्यांचा Honor 8C मोबाईल फोन लॉन्च करू शकतो. हा डिवाइस नुकताच चीन मध्ये सेल साठी उपलब्द झाला आहे. असे बोलले जात आहे कि हा भारतात लवकरच म्हणजे पुढल्या आठवड्यातच लॉन्च केला जाऊ शकतो.
गेल्या महिन्यात Honor 8C मोबाईल फोन अधिकृतरित्या चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये अनेक खास फीचर उपलब्ध आहेत, हा डिवाइस एका नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट पण मिळणार आहे. या डिवाइसची किंमत चीन मध्ये समोर आली आहे, पण अजूनतरी याची भारतातील किंमत समजली नाही. हा मोबाईल फोन तीन वेगवेगळ्या रंगात लॉन्च करण्यात आला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि हा मॅजिक नाईट ब्लॅक, ऑरोरा ब्लू आणि प्लॅटिनम गोल्ड रंगात लॉन्च करण्यात आला आहे. तसेच असे बोलले जात आहे कि हॉनर काही नवीन रंग पण यात ऍड करू शकतो, Nebula Purple रंग पण यात सामील केला जाईल.
Honor 8C स्पेसिफिकेशन्स आणि फीचर
जर स्पेक्स बद्दल बोलायचे झालेच तर Honor 8C मोबाईल फोन एका 6.26-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. चीन मध्ये हा डिवाइस विकत घेतला जाऊ शकतो. मोबाईल फोन मध्ये एक नॉच डिस्प्ले आहे. त्याचबरोबर हा फोन एका स्नॅपड्रॅगॉन 632 ओक्टा-कोर चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला 4GB रॅम 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शन मिळत आहेत. तसेच हा एका एक 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये पण येणार असल्याची चर्चा आहे.
Honor 8C मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे, या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 13+2MP चा कॅमेरा सेटअप मिळत आहे. तसेच फ्रंटला यात एक 8-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे, जो LED फ्लॅश सह फोन मध्ये आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, फोन मध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि एक 3.5mm ऑडियो जॅक मिळत आहे. हा मोबाईल फोन एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च केला जाऊ शकतो.