Honor ने लाँच केला अप्रतिम स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Updated on 09-Jan-2023
HIGHLIGHTS

Honor 80 Pro Straight Screen Edition नवीन स्मार्टफोन लाँच

नवीन स्मार्टफोनची किंमत सुमारे 43,300 रुपये

फोनमध्ये 66W सुपरफास्ट चार्जिंगसह 4800mAh बॅटरी आहे.

Honor ने देशांतर्गत बाजारात Honor 80 Pro स्ट्रेट स्क्रीन एडिशन लॉन्च केले आहे. या फोनची फीचर्स Honor 80 सिरीजच्या Honor 80 Pro फोन सारखीच आहेत. Honor 80 Pro स्ट्रेट स्क्रीन एडिशन नवीन फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. याशिवाय Honor 80 Pro Straight Screen Edition मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आले आहे. बघुयात सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : या '3' अफोर्डेबल स्मार्टवॉच स्वस्तात खरेदी करा, Amazonवर मिळेल 75% पर्यंत प्रचंड सूट

Honor 80 Pro Straight Screen Editionचे स्पेसिफिकेशन्स

Honor 80 Pro Straight Screen Edition मध्ये Dual SIM सह Android 12 आधारित Magic OS 7.0 आहे. याशिवाय, यात 6.67-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1000 nits आहे. स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 730 GPU, 12 GB RAM सह 256 GB स्टोरेज आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, Honor 80 Pro स्ट्रेट स्क्रीन एडिशनमध्ये 5G, Bluetooth v5.2, Wi-Fi 802.11a/b/g/n/ac/ax, NFC, USB OTG, GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि फेस अनलॉक देखील आहे. फोनमध्ये 66W सुपरफास्ट चार्जिंगसह 4800mAh बॅटरी आहे. 

Honor 80 Pro Straight Screen Edition मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 160 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे.

Honor 80 Pro स्ट्रेट स्क्रीन एडिशनची किंमत

Honor 80 Pro Straight Screen Edition ची किंमत 3,599 चीनी युआन म्हणजेच सुमारे 43,300 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 256 जीबी स्टोरेजसह 12 जीबी रॅमच्या याच प्रकारात उपलब्ध असेल. ऑनरचा हा फोन ब्राइट ब्लॅक, इंक झेड ग्रीन आणि मॉर्निंग ग्लो कलरमध्ये खरेदी करता येईल. या फोनच्या ग्लोबल लॉन्चिंगची सध्या कोणतीही बातमी नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :