Honor 8 Pro ला भारतात मिळत आहे एंड्रॉयड ओरिओ वर आधारित EMUI 8.0 अपडेट

Honor 8 Pro ला भारतात मिळत आहे एंड्रॉयड ओरिओ वर आधारित EMUI 8.0 अपडेट
HIGHLIGHTS

या अपडेट ची साइज 2.81GB आहे आणि हा अपडेट ऑब्जेक्ट रिकॉग्निजशन, स्मार्ट टिप्स, आणि AI एक्सिलिरेटेड ट्रांसलेटर सारखे काही AI-आधारित फीचर्स घेऊन येईल.

ऑनर च्या आधीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन, Honor 8 Pro ला, भारतात एंड्रॉयड ओरिओ वर आधारित EMUI 8.0 अपडेट मिळत आहे. XDA डेवलपर्स मंचावर पोस्ट केल्या गेलेल्या स्क्रीनशॉट वरून असे कळतेय की हा अपडेट 2.81GB चा असेल तसेच यात काही UI बदलांसोबत नवीन AI-आधारित फीचर्स चा सामवेश करण्यात आला आहे, ज्यात ऑब्जेक्ट रिकॉग्निजशन, स्मार्ट टिप्स, आणि AI एक्सिलिरेटेड ट्रांसलेटर फिचर चा सामवेश आहे.

Honor 8 pro ला मागच्या वर्षी जुलै मध्ये भारतात लाँच केले गेले होते. ह्या फोन मध्ये 5.7 इंचाचा QHD डिस्प्ले आहे. हा फोन 6 जीबी रॅम सह कंपनी च्या आपल्या हाईसिलिकॉन किरिन 960 एसओसी वर चालतो.

बॅक साइडल, ह्या फोन मध्ये 12MP चा डुअल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे, तर फ्रंट कॅमरा 8MP चा आहे. हा फोन 4000 एमएएच च्या बॅटरी सह येतो. कंपनीचा सध्याचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे Honor View 10 जो मागच्या वर्षी भारतात लाँच झाला होता. 

फोन ची विशेषता म्हणजे किरीन 970 एसओसी आहे, जो AI संबंधित काम करण्यासाठी एक न्यूरल प्रोसेसिंग इंजन (NPU) ने युक्त आहे. फोन मध्ये 5.99 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे, डिस्प्ले 18:9 एस्पेक्ट रेशियो वाला आहे. ह्या फोन मध्ये 3750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे आणि 128GB इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. फोन च्या बॅक साइडला 16MP+20MP च्या कॉम्बिनेशनचा डुअल कॅमरा सेटअप आहे आणि फ्रंट साइडला 13MP चा सेल्फी कॅमरा आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo