Huawei च्या सब-ब्रांड Honor ने आपल्या त्या स्मार्टफोन्स ची एक लिस्ट जारी केली आहे, ज्यांना एंड्राइड Oreo अपडेट मिळाला आहे. आपल्या शब्द पूर्ण करत चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ने आपल्या Honor 7x स्मार्टफोन ला पण हा अपडेट दिला आहे. या डिवाइसला आता भारतात पण हा अपडेट मिळाला आहे. या अपडेट मध्ये फोनला खुप काही नवीन मिळाले आहे, याचा अर्थ असा की या डिवाइसला अनेक नवीन फीचर्स मिळाले आहेत.
या नवीन फीचर्स बद्दल बोलायचे तर एंड्राइड Oreo यात आल्यानंतर तुम्हाला अनेक दमदार फीचर्स आणि बदल मिळतील. यामुळे तुमचा हा डिवाइस वेगवान आणि सेफ होईल. पहिला फीचर पाहता यात तुम्हाला एक फ्लोटिंग नेविगेशन डॉक मिळत आहे. हे बटन तुम्ही स्क्रीन कुठेही ठेवू शकता. हा फीचर इनेबल करण्यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन सिस्टम मध्ये जावे लागेल, त्यानंतर तुम्ही सिस्टम नेविगेशन मध्ये जाऊन नेविगेशन डॉक वर जाऊन हा सेट करू शकता.
तसेच यात स्क्रीन टच ला दुर्घटने पासून वाचविण्यासाठी पण प्रोटेक्शन मध्ये सुधार झाला आहे. तसेच तुम्ही तुमचे करियर डिटेल्स पण सिंक करू शकता, यात तुम्ही लिंक्डइन कॉन्टेक्ट्स फोन कॉन्टेक्ट्स सोबत अणि ईमेल-अॅप्स वर जाऊन सिंक करू शकता. त्याचबरोबर सेटिंग मेनू पण बदलण्यात आला आहे फोन मॅनेजर पण खुप सिंपल केला आहे. तसेच VoLTE क्षमता पण सुधारण्यात आली आहे, ज्यात वोडाफोन, आयडिया सेलुलर आणि एयरटेल पण सामील आहेत.
या Oreo अपडेट ची साइज 2.94GB आहे, त्यामुळे हा अपडेट करण्यासाठी तुम्हाला एका स्टेबल कनेक्शन ची गरज पडेल. जर तुम्हाला आता पर्यंत कोणतीही नोटिफिकेशन मिळाली नसेल तर तुम्ही मॅन्युअली बघू शकता, त्यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन फोन इन्फो मध्ये जावे लागेल, त्यानंतर तुम्ही सॉफ्टवेयर अपडेट वर जाऊन चेक करु शकता.