मागच्या महिन्यात Honor 7A स्मार्टफोन लॉन्च केल्या नंतर आता असे वाटत आहे की Honor आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. नवीन लीक नुसार या स्मार्टफोनला Honor 7S नाव दिले जाईल. WinFuture च्या रिपोर्ट मधून Honor 7S स्मार्टफोन च्या रेंडर, किंमत आणि स्पेसिफिकेशन ची माहिती मिळाली आहे. डिवाइस ची डिझाइन सध्या असलेल्या Honor च्या इतर स्मार्टफोन्स सारखीच आहे. डिवाइस च्या फ्रंटला बारीक बेजल्स आहेत आणि बॉटमला Honor चा लोगो आहे. डिवाइस च्या बॅक ला कॅमेरा मोड्यूल आणि Honor लोगो आहे.
किंमत
लीक नुसार, हा स्मार्टफोन यूरोपीय बाजारात €120-€140 (जवळपास Rs 9,600-11,200) च्या किंमतीत लॉन्च होईल. लॉन्च नंतर हा स्मार्टफोन यूरोप मध्ये कंपनी चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनेल. डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता कमी आहे.
हे स्पेसिफिकेशन्स असतील यात
आशा आहे की Honor 7S मध्ये 5.45 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले असेल ज्याचे रेजोल्यूशन 1440×720 पिक्सल असेल आणि या डिवाइस मध्ये मीडियाटेक MT6739 64-बिट क्वाॅड-कोर SoC असेल. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज असेल जी माइक्रो एसडी कार्ड ने वाढवता येईल. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असेल. डिवाइस मध्ये 3,020mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.
फिंगरप्रिंट सेंसर चा अभाव दिसेल पण सिक्योरिटी साठी डिवाइस मध्ये फेशियल रेकोग्निशन फीचर असू शकतो. कनेक्टिविटी साठी हा डिवाइस 4G LTE, डुअल-सिम कार्ड स्लॉट्स ऑफर करेल आणि एंड्राइड 8.0 ओरियो सह EMUI 8.0 वर चालेल.