Honor ने आपला नवीन स्मार्टफोन Honor 7C चीन मध्ये लॉन्च केला आहे. या फोन च्या नावावरुन तुम्हाला समजले असेल की याचे खुप सारे फीचर्स Honor 7X सारखे असतिल, पण कमी स्पेसिफिकेशन सह.
या डिवाइस मध्ये 5.99 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, जो 18:9 एस्पेक्ट रेश्यो सह येतो. Honor 7C स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो 13MP यूनिट सह 2MP च्या डेफ्थ सेंसिंग कॅमेरा सह येतो, डिवाइस च्या फ्रंट मध्ये एक 8MP चा कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेंसर फोन च्या बॅक साइड मध्ये आहे आणि हा फेस अनलॉक सह येतो. हा फोन EMUI 8.0 वर चालतो, जो एंड्रॉयड ओरियो वर आधारित आहे.
ही बाब विशेष लक्ष देण्यासारखी आहे की Honor 7C, कंपनी च्या त्या काही फोन्स मधील एक आहे, जो हुवावे च्या हाई–सिलिकॉन किरिन एसओसी च्या चिपसेट ऐवजी क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.
हा फोन 2 वेरियंट मध्ये उपलब्ध आहे, पहिला वेरियंट 3GB रॅम + 32GB स्टोरेज सह येतो, ज्याची किंमत आहे CNY 899 (जवळपास Rs 9,200) आणि दूसरा वेरियंट 4GB रैम + 64GB स्टोरेज सह येतो, ज्याची किंमत CNY 1299 (जवळपास Rs 13,300) आहे.
याची माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही की कंपनी या फोन ला भारतात कधी लॉन्च करेल. Honor 9 Lite भारतात कंपनी ने लॉन्च केलेला शेवटचा स्मार्टफोन होता. हा 18:9 एस्पेक्ट रेशियो सह 5.65 इंचाच्या डिस्प्ले आणि क्वॉड-कोर कॅमेरा सेटअप सह येतो.