Honor 7A स्मार्टफोन उद्या पुन्हा एकदा Flipkart वर सेल साठी होणार आहे उपलब्ध

Updated on 04-Jun-2018
HIGHLIGHTS

आपल्या पहिल्या सेल मध्ये काही मिनिटांत सेल आउट झाल्यानंतर Honor 7A स्मार्टफोन पुन्हा एकदा सेल साठी 5 जूनला फ्लिपकार्ट वर सेल साठी येईल, हा सेल फ्लिपकार्ट वर दुपारी 12 वाजता सुरू होईल.

Honor ने काही दिवसांपूर्वी भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोंस लॉन्च केले होते, या स्मार्टफोंस मध्ये Honor 7A आणि Honor 7C स्मार्टफोंस चा समावेश आहे, याव्यतिरिक्त कंपनी ने पाकिस्तान मध्ये पण एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो Honor 7S नावाने एंट्री-लेवल स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च करण्यात आला आहे. पण आज आपण बोलणार आहोत, Honor 7A स्मार्टफोन बद्दल. याच्या लॉन्च नंतर दुसर्‍यांदा फ्लिप्कार्ट च्या माध्यमातून सेल साठी येणार आहे. या डिवाइस चा सेल फ्लिपकार्ट वर दुपारी 12 वाजल्या पासून सुरू होईल. या डिवाइस सोबत फ्लिपकार्ट वर तुम्हाला काही दमदार ऑफर्स पण मिळत आहेत. 
Honor 7A स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून फक्त Rs 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, पण बाजारत याची खरी किंमत Rs 10,999 आहे. त्याचबरोबर एक्सिस बँक च्या माध्यमातून पेमेंट केल्यास यूजर्सना 5 टक्क्यांचा कॅशबॅक पण देण्यात येईल. या व्यतिरिक्त Rs 2,000 चा डिस्काउंट पण तुम्हाला या फोन सोबत मिळेल. 
Honor 7A स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन ड्यूल सिम सपोर्ट आणि एंड्राइड Oreo सह लॉन्च करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक 5.7-इंचाचा HD+ डिस्प्ले 720×1440 पिक्सल रेजोल्यूशन सह 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळतो. फोन ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे.  
कॅमेरा बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या बॅक वर एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि एक 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. तर सेल्फी साठी या डिवाइस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन ची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवू शकता.  
Honor 7A भारतात फ्लिप्कार्ट एक्सक्लूसिव स्मार्टफोन च्या रुपात सादर करण्यात आला आहे, तर Honor 7C अमेजॉन एक्सक्लूसिव डिवाइस च्या रुपात लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही डिवाइस HiHonor ऑनलाइन स्टोर वरून पण विकत घेता येतील. दोन्ही डिवाइस ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएन्ट्स मध्ये उपलब्ध होतील. Honor 7A 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे आणि याची किंमत 8,999 रूपये ठेवण्यात आली आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :