Honor 7A स्मार्टफोन उद्या दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट वर सेल साठी होईल उपलब्ध

Updated on 28-May-2018
HIGHLIGHTS

ड्यूल कॅमेरा सह येणारा Honor 7A स्मार्टफोन उद्या दुपारी 12 वाजता Flipkart वर सेल साठी होईल उपलब्ध.

काही दिवसांपूर्वी भारतात Honor ने आपले दोन नवीन स्मार्टफोंस Honor 7A आणि Honor 7C च्या रुपात लॉन्च केले आहेत, हे डिवाइस Honor 10 बाजारात आल्यानंतर काही दिवसांनी लॉन्च करण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोंस बद्दल बोलायचे तर हे तुमच्या बजेट मध्ये येतात आणि सर्वात मोठी खासियत यांचा ड्यूल कॅमेरा आहे. 

हे स्मार्टफोंस ड्यूल कॅमेरा लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोंस स्मार्टफोंस एज-टू-एज डिस्प्ले, फेशियल रेकोग्निशन सारख्या फीचर्स सह लॉन्च करण्यात आले आहेत. Honor 7A स्मार्टफोन उद्या पहिल्यांदा सेल साठी येणार आहे. हा फ्लिपकार्ट वर दुपारी 12 वाजता सेल साठी येईल. तसेच Honor 7C स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर हा 31 मे ला सेल साठी येणार आहे. 

Honor 7A स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन ड्यूल सिम सपोर्ट आणि एंड्राइड Oreo सह लॉन्च करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक 5.7-इंचाचा HD+ डिस्प्ले 720×1440 पिक्सल रेजोल्यूशन सह 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळतो. फोन ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे.  

कॅमेरा बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या बॅक वर एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि एक 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. तर सेल्फी साठी या डिवाइस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन ची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवू शकता.  
Honor 7A भारतात फ्लिप्कार्ट एक्सक्लूसिव स्मार्टफोन च्या रुपात सादर करण्यात आला आहे, तर Honor 7C अमेजॉन एक्सक्लूसिव डिवाइस च्या रुपात लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही डिवाइस HiHonor ऑनलाइन स्टोर वरून पण विकत घेता येतील. दोन्ही डिवाइस ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएन्ट्स मध्ये उपलब्ध होतील. Honor 7A 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे आणि याची किंमत 8,999 रूपये ठेवण्यात आली आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :