Honor ने भारतात बजेट सेगमेंट मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स Honor 7A आणि Honor 7C लॉन्च केले आहेत. काही महिन्यांपूर्वी हे डिवाइस चीन मध्ये लॉन्च करण्यात आले होते त्यामुळे आम्हाला या फोन्स बद्दल खुप काही माहीत आहे. हे दोन्ही डिवाइस कंपनी ने बजेट सेगमेंट मध्ये सादर केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये एज-टू-एज डिस्प्ले, फेशियल रेकोग्निशन आणि डुअल रियर कॅमेरा सारखे फीचर्स आहेत.
हे डिवाइस भारतात सादर करण्यासाठी यात काही नवीन फीचर्स सामील करण्यात आले आहेत ज्यात राइड मॉड, पेटीएम सिंगल टच एक्सेस फीचर (जो तुमच्या फिंगरप्रिंट चा वापर करतो), डेडिकेटेड माइक्रो एसडी कार्ड+डुअल सिम कार्ड स्लॉट हे आहेत. दोन्ही फोन्स मध्ये समान डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि सोबतच या फोन्स मध्ये पार्टी मोड पण आहे ज्या मधून तुम्ही एका वेळी 7 स्मार्टफोन्स जोडून एकच म्युजिक प्ले करू शकता. फोन्स मध्ये Huawei Histen चे 3D साउंड इफेक्ट्स पण देण्यात आले आहेत जे हेडफोन्स सोबत काम करतात आणि ऑडियो लिस्निंग अनुभव चांगला करतात.
किंमत आणि उपलब्धता
Honor 7A भारतात फ्लिप्कार्ट एक्सक्लूसिव स्मार्टफोन च्या रुपात सादर करण्यात आला आहे, तर Honor 7C अमेजॉन एक्सक्लूसिव डिवाइस च्या रुपात लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही डिवाइस HiHonor ऑनलाइन स्टोर वरून पण विकत घेता येतील. दोन्ही डिवाइस ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएन्ट्स मध्ये उपलब्ध होतील.
Honor 7A 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे आणि याची किंमत 8,999 रूपये ठेवण्यात आली आहे. या डिवाइस चा सेल 29 मे दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट वर सुरू होईल.
अमेजॉन एक्सक्लूसिव Honor 7C पाहता या डिवाइस चे दोन वेरिएन्ट्स आहेत, याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 9,999 रूपये आहे, तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 11,999 रूपये आहे. या स्मार्टफोन चा सेल 31 मे दुपारी 12 वाजता सुरू होईल.
Honor 7A
Honor 7A स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन ड्यूल सिम सपोर्ट आणि एंड्राइड Oreo सह लॉन्च करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक 5.7-इंचाचा HD+ डिस्प्ले 720×1440 पिक्सल रेजोल्यूशन सह 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळतो. फोन ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या बॅक वर एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि एक 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. तर सेल्फी साठी या डिवाइस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन ची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवू शकता.
Honor 7C
या डिवाइस मध्ये 5.99 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्यात 18:9 एस्पेक्ट रेश्यो आहे. Honor 7C स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो 13MP यूनिट सह 2MP च्या डेफ्थ सेंसिंग कॅमेरा सह येतो, डिवाइस च्या फ्रंट ला एक 8MP चा कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेंसर फोन च्या बॅक साइडला आहे आणि हा फेस अनलॉक सह येतो. हा फोन EMUI 8.0 वर चालतो, जो एंड्रॉयड ओरियो वर आधारित आहे.
विशेष म्हणजे Honor 7C, कंपनी च्या त्या काही डिवाइस पैकी एक आहे, जो हुवावे च्या हाई-सिलिकॉन किरिन एसओसी ऐवजी क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट ने संचालित आहे. या डिवाइस मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे