एका नवीन हँडसेटने 5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Honor 70 5G आहे. कंपनीने हा फोन नुकताच मलेशियामध्ये लाँच केला आहे. हा फोन 8 GB रॅम + 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. कंपनीने मलेशियामध्ये या फोनची किंमत MYR 1999 म्हणजेच सुमारे 35,600 रुपये ठेवली आहे. Honor चा हा नवीनतम स्मार्टफोन 54 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 60 W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे. हा फोन क्रिस्टल सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक आणि एमराल्ड ग्रीन या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे.
हे सुद्धा वाचा : 43 ते 65 इंच लांबीचे 'हे' महागडे स्मार्ट TV निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध, बघा यादी
फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. हा Honor फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. कंपनी या फोनमध्ये Snapdragon 778G+ चिपसेट देत आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 54-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4800mAh बॅटरी आहे. ही बॅटरी ६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा Honor फोन Android 11 वर आधारित Magic UI 6.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एजीपीएस, USB टाइप-C पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि Wi -Fi सारखे पर्याय देण्यात आले आहेत.