54MP मागील आणि 32MP फ्रंट कॅमेरासह HONOR चा नवीन 5G फोन, मिळेल 66W सुपरफास्ट चार्जिंग

54MP मागील आणि 32MP फ्रंट कॅमेरासह HONOR चा नवीन 5G फोन, मिळेल 66W सुपरफास्ट चार्जिंग
HIGHLIGHTS

Honor 70 5G स्मार्टफोन लाँच

हा फोन 8 GB रॅम + 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो

नवीन स्मार्टफोनची किंमत सुमारे 35,600 रुपये

एका नवीन हँडसेटने 5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Honor 70 5G आहे. कंपनीने हा फोन नुकताच मलेशियामध्ये लाँच केला आहे. हा फोन 8 GB रॅम + 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. कंपनीने मलेशियामध्ये या फोनची किंमत MYR 1999 म्हणजेच सुमारे 35,600 रुपये ठेवली आहे. Honor चा हा नवीनतम स्मार्टफोन 54 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 60 W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे. हा फोन क्रिस्टल सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक आणि एमराल्ड ग्रीन या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे.

हे सुद्धा वाचा : 43 ते 65 इंच लांबीचे 'हे' महागडे स्मार्ट TV निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध, बघा यादी

Honor 70 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. हा Honor फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. कंपनी या फोनमध्ये Snapdragon 778G+ चिपसेट देत आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 54-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4800mAh बॅटरी आहे. ही बॅटरी ६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा Honor फोन Android 11 वर आधारित Magic UI 6.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एजीपीएस, USB टाइप-C  पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि Wi -Fi सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo