ऑनर 5C स्मार्टफोनमध्ये किरिन 650 चिपसेट, 1.7GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर, 2GB रॅम, 13MP चा रियर आणि 8MP चा फ्रंट फेसिंंग कॅमेरा दिला गेला आहे.
हुआवे ने आपल्या ब्रँड ऑनरचा एक नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनचे स्पेक्स विषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची IPS LCD पुर्ण HD डिस्प्ले आहे.
स्मार्टफोनमध्ये किरिन 650 चिपसेटसह 1.7GHz चे (4xCortex-A53@2.0 GHz + 4xCortex-A53@1.7GHz) ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 16GB चे ऑनबोर्ड स्टोरेज आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅश आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ऑनर 5C हा एक ड्यूल सिम आणि मल्टीब्रँड 2G/3G सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे, जो Cat.6 LTE (केवळ 4G व्हर्जन) ला सुद्धा सपोर्ट करतो. त्याशिवाय ब्लूटुथ v4.1, FM रेडियो रिसिवरसुद्धा दिला गेला आहे. हा फोन सध्यातरी चीनमध्ये मिळत आहे. ऑनरच्या 5C च्या 3G सपोर्ट मॉडलची किंमत CNY 899 (139 यूएस डॉलर) मध्ये आणि 4G सपोर्ट मॉडलची किंमत CNY 100 आहे.