ऑनर 5C स्मार्टफोन झाला फ्लिपकार्ट आणि ऑनर स्टोरवरही उपलब्ध

ऑनर 5C स्मार्टफोन झाला फ्लिपकार्ट आणि ऑनर स्टोरवरही उपलब्ध
HIGHLIGHTS

त्याचबरोबर अशी माहिती मिळत आहे की. ऑनर स्टोरवरुन 5C स्मार्टफोन खरेदी केल्यावर ऑनर 6प्लस सुद्धा जिंकू शकतात.

फ्लिपकार्टवर खरेदी करा ऑनर 5C १०,९९९ रुपयात

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ऑनरने अलीकडे भारतीय बाजारात आपला नवीन फोन ऑनर 5C लाँच केला. 30 जूनला ह्या स्मार्टफोनचे फ्लॅश सेलचे आयोजन सुद्धा केले होते. आता कंपनीने अशी माहिती दिली आहे की, ऑनर 5C ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर आणि ऑनर स्टोरवरही उपलब्ध झाला आहे. तसेच ऑनर स्टोरवरुन 5C स्मार्टफोन खरेदी केल्यावर ऑनर 6प्लस सुद्धा जिंकू शकतात. विजेत्यांची घोषणा ७ जुलैला ऑनर इंडियाच्या फेसबुक पेजवर केली जाईल.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन किरिन 650 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या फोनला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे आणि ह्यावर हुआवे EMUI 4.1 दिला आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स

ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्याचे अॅपर्चर f/2.0 आहे. हा 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह येतो. हा 77 डिग्री वाइड अँगल्स लेन्ससह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE सह VoLTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. ह्यात वायफाय, ब्लूटुथ 4.1, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB 2.0 पोर्ट देण्यात आले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर 2.0 सुद्धा दिला गेला आहे. ह्यात ड्यूल स्टिरियो स्पीकर्ससुद्धा आहेत. ह्याचा आकार 147.1×73.8×8.3 mm आणि वजन १५६ ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo