हुआवेेने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन ऑनर 5C लाँच केला. कंपनीने भारतीय बाजारात ह्याची किंमत १०,९९९ रुपये ठेवली आहे. हा फोन आज फ्लॅशसेलमध्ये उपलब्ध होईल. कंपनी आज ह्याच्या पहिल्या फ्लॅशसेलचे आयोजन करत आहे. ह्या फोनसाठी आज दुपारी १ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन केले जाईल. आणि दुपारी २ वाजता ह्याचा फ्लॅशसेल सुरु होईल. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर हा फ्लॅशसेल होणार आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन किरिन 650 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या फोनला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे आणि ह्यावर हुआवे EMUI 4.1 दिला आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…
ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्याचे अॅपर्चर f/2.0 आहे. हा 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह येतो. हा 77 डिग्री वाइड अँगल्स लेन्ससह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE सह VoLTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. ह्यात वायफाय, ब्लूटुथ 4.1, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB 2.0 पोर्ट देण्यात आले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर 2.0 सुद्धा दिला गेला आहे. ह्यात ड्यूल स्टिरियो स्पीकर्ससुद्धा आहेत. ह्याचा आकार 147.1×73.8×8.3 mm आणि वजन १५६ ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – आता लकी ड्रॉ ठरविणार कोणाला मिळणार फ्रीडम 251 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5