Honor 200 Series: Honor ची नवीन स्मार्टफोन सिरीज Honor 200 सिरीज भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या सिरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सिरीजअंतर्गत Honor 200 5G आणि Honor 200 Pro 5G फोन्सचा समावेश आहे. Honor 200 5G ची जाडी फक्त 7.7mm आहे. फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आणले गेले आहेत. जाणून घेऊयात Honor 200 सिरीजची किंमत-
Also Read: Price Cut! Samsung Galaxy M35 5G लाँच केल्यानंतर लगेच M34 5G झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
Honor 200 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. दोन्ही फोनची किंमत अनुक्रमे 35,999 आणि 39,999 रुपये इतकी आहे. Honor 200 5G स्मार्टफोन मूनलाइट व्हाइट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Honor 200 Pro 5G व्हेरिएंट 57,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या 12GB रॅमसह 512GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. हा फोन ब्लॅक आणि ओशन सायन या कलर ऑप्शन्समध्ये येतो.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 20 जुलैपासून ॲमेझॉन प्राइम डे सेलदरम्यान सुरू होईल. लाँच ऑफर अंतर्गत, ICICI बँकेवर 8000 रुपयांची सूट आणि 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल. ही ऑफर 20-21 जुलैपर्यंतच वैध आहे.
Honor 200 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED क्वाड कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, Honor 200 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच लांबीचा फुल HD+ कर्व OLED डिस्प्ले प्रदान केला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे.
Honor 200 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. तर, प्रो फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 SoC प्रोसेसर मिळेल.
सामान्य मॉडेल Honor 200 दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये टॉप मॉडेल 12GB रॅम + 512GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तर, प्रो व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना स्टोरेजशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही.
Honor 200 5G फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मेन कॅमेरा मिळेल. तसेच, मागील बाजूस 50MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहे. याशिवाय, 12MP अल्ट्रा वाइड आणि मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस 50MP पोर्ट्रेट सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.
फोटोग्राफीसाठी Honor 200 Pro मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. यात 50MP OmniVision OV50H प्रायमरी सेन्सर, 12MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 50MP 2.5x पोर्ट्रेट टेलीफोटो लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP + 2MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.
पॉवर बॅकअपसाठी, Honor 200 मोबाईल फोन 5,200mAh बॅटरीने सुसज्ज आहे. फास्ट चार्जिंगसाठी यात 100W सुपर चार्ज फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. तर, Honor 200 Pro मध्ये पॉवर बॅकअप 5,200mAh बॅटरी आहे. 100W सुपरचार्जच्या वेगाने फोन जलद चार्ज होऊ शकतात. वापरकर्त्यांना 66W वायरलेस सुपरचार्ज फास्ट तंत्रज्ञान वापरण्याची संधी देखील मिळेल.