लोकप्रिय टेक ब्रँड Honor च्या आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. आता अखेर भारतीय बाजारात कंपनीचा नवीन स्मार्टफोन Honor 200 Lite लाँच करण्यात आला आहे. Honor ने आपल्या Honor 200 सिरीजचा विस्तार करत हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, विशेषतः या उपकरणात ‘मॅजिक कॅप्सूल’ फिचर उपलब्ध आहे. हे फिचर iPhone मध्ये असलेल्या डायनॅमिक आयलँड फिचरप्रमाणे कार्य करते. चला तर मग जाणून घेऊयात Honor 200 Lite फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: नवीनतम Infinix Zero 40 5G भारतीय बाजारात लाँच! विशेष AI फीचर्ससह मिळेल फोटोग्राफीचा उत्तम अनुभव
वर सांगितल्याप्रमाणे, Honor 200 Lite स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. SBI ग्राहक 2000 रुपयांची तात्काळ सवलत मिळवू शकतात. याद्वारे प्रभावी किंमत 17,999 रुपयांवरून 15,999 रुपयांपर्यंत येते. स्मार्टफोनची विक्री 27 सप्टेंबर 2024 रोजी 12am पासून चॅनेलवर सुरू होईल. तर, Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा भाग म्हणून डिव्हाइसवर Amazon प्राइम सदस्यांना 26 सप्टेंबर 2024 रोजी 12AM ला म्हणजेच 24 तास लवकर प्रवेश मिळेल.
Honor च्या या स्मार्टफोनमध्ये मोठा 6.78 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनमध्ये मॅजिक कॅप्सूल उपलब्ध आहे. जो iPhone च्या डायनॅमिक आयलंड फिचरप्रमाणेच काम करतो. एवढेच नाही तर, या हँडसेटमध्ये AI फीचर्सही उपलब्ध आहेत. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे आणि स्क्रीन ते बॉडी रेशो 93.7 टक्के आहे. याची विशेषता म्हणजे डोळ्यांना किंचितही इजा होणार नाही. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे.
स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 8GB रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 108MP प्राथमिक सेन्सर, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4,500mAh ची मजबूत बॅटरी मिळेल. ही बॅटरी 35W रॅपिड चार्जिंगच्या सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारख्या अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.