Honor 200 5G सिरीज ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच! जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि काय मिळेल विशेष?

Honor 200 5G सिरीज ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच! जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि काय मिळेल विशेष?
HIGHLIGHTS

नवीन Honor 200 5G सिरीजची भारतीय लाँच डेट जाहीर

सिरीजअंतर्गत कंपनी Honor 200 5G आणि Honor 200 Pro 5G स्मार्टफोन लाँच करणार

Honor 200 5G सिरीजच्या दोन्ही उपकरणांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI फीचर्स असतील.

Honor 200 5G Series: स्मार्टफोन निर्माता Honor ने भारतात नवीन Honor 200 5G सिरीजची लाँच डेट जाहीर केली आहे. या लाइनअप अंतर्गत कंपनी Honor 200 5G आणि Honor 200 Pro 5G भारतीय बाजारपेठेत करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन्ही उपकरणांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI फीचर्स असतील. याशिवाय, अनेक नवीनतम फीचर्स असल्याची माहिती मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Honor 200 5G सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: OPPO Reno 12 5G सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! आगामी स्मार्टफोन्स जबरदस्त AI फीचर्सने सज्ज

Honor 200 5G सिरीजचे भारतीय लॉन्चिंग

प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर Honor 200 5G सिरीजबद्दल एक मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे. त्यानुसार, Honor 200 5G सिरीज 18 जुलै रोजी लाँच केली जाणार आहे. या सिरीजचे लॉन्चिंग इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल. लक्षात घ्या की, Honor 200 5G सिरीजचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

honor 200 series

स्मार्टफोन ब्रँड Honor ने 200 5G सीरीज लाँच करण्यासंदर्भात अद्याप कोणतेही अपडेट दिले नाही. परंतु लीकनुसार, सिरीजची प्रारंभिक किंमत 40 ते 50 हजार दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे.

Honor 200 5G सिरीजचे अपेक्षित तपशील

पुढे आलेल्या अहवालानुसार, आगामी Honor 200 5G सिरीजच्या बेस मॉडेलमध्ये 6.7-इंच लांबीचा क्वाड कर्व डिस्प्ले मिळेल. तर, HONOR 200 Pro 5G मध्ये 6.78-इंच लांबीचा क्वाड कर्व डिस्प्ले मिळेल. या दोन्ही स्क्रीनचा रिफ्रेश दर 120Hz असेल. त्याबरोबरच, Honor 200 आणि 200 Pro 5G मध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी, OIS सपोर्टसह 50MP मेन सेन्सर आणि 50MP टेलिफोटो लेन्स प्रदान केले जातील.

याव्यतिरिक्त, बेस मॉडेलमध्ये समोर एकच कॅमेरा सेटअप असेल आणि 200 Pro 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. पॉवरसाठी, HONOR 200 सिरीजमधील दोन्ही मोबाईल फोनमध्ये 5,200mAh ची बॅटरी दिली जाईल, जी 100W जलद चार्जिंगसह सुसज्ज असेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही फोन्समध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo