digit zero1 awards

Honor 100 Series: तब्बल 100W चार्जिंग आणि 50MP कॅमेरासह नवे स्मार्टफोन्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Honor 100 Series: तब्बल 100W चार्जिंग आणि 50MP कॅमेरासह नवे स्मार्टफोन्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 
HIGHLIGHTS

Honor ची फ्लॅगशिप सीरीज Honor 100 Series अखेर लाँच

सिरीजमध्ये Honor 100 आणि Honor 100 Pro या दोन मॉडेल्सचा समावेश

Honor 100 हा नवीन Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह येणारा पहिला हँडसेट आहे.

Honor ची फ्लॅगशिप सीरीज Honor 100 Series अखेर टेक विश्वात लाँच झाली आहे. आता लवकरच या स्मार्टफोन्सची विक्री चीनमध्ये सुरू होईल आणि हा फोन इतर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पोहोचणार आहे. या सिरीजमध्ये Honor 100 आणि Honor 100 Pro या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. Honor 100 हा नवीन Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह येणारा पहिला हँडसेट आहे. चला जाणून घेऊया या सिरीजची किमंत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: भारीच की! Airtel ने लाँच केला नवा प्रीपेड प्लॅन, Unlimited डेटासह Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News

Honor 100 Series

Honor 100 सिरीजची किंमत

Honor 100 स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत CNY 2,499 म्हणजेच अंदाजे 29,600 रुपये इतकी ठेवली गेली आहे. तर, Pro मॉडेलची किंमत CNY 3,399 म्हणजेच अंदाजे 40,300 रुपयांपासून सुरू होते. दोन्ही स्मार्टफोन पर्पल, ब्लू, व्हाइट आणि ब्लॅक या चार कलर ऑप्शन्समध्ये येतात.

Honor 100 सिरीज

डिस्प्ले

Honor 100 स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या OLED डिस्प्लेसह येतो, जो 2664×1200 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो.

तर, प्रो व्हेरिएंट 6.78-इंच लांबीच्या 1.5K OLED डिस्प्लेसह येते जी 2700×1224 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करते. लक्षात घ्या की, दोन्ही मॉडेल्समध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 nits पीक ब्राइटनेस मिळेल.

प्रोसेसर

Honor 100 स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित आहे, तर Honor 100 Pro स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसह सुसज्ज आहे. याशिवाय यामध्ये इन-हाउस C1 चिप आणि VC लिक्विड कूलिंग सिस्टम देखील आहे.

स्टोरेज

Honor 100 मध्ये 512GB पर्यंत स्टोरेज व्हेरिएंट मिळतील. तर, Honor 100 Pro मध्ये 16GB रॅमसह 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळतात. दोन्ही डिव्हाइस मॅजिकओएस 7.2 चालवतात जे Android 13 वर आधारित आहे.

Honor 100 Pro
Honor 100 Pro

कॅमेरा

Honor 100 च्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP प्राथमिक लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी तुम्हाला 50MP फ्रंट कॅमेरा मिळत आहे

दरम्यान, Honor 100 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 32MP OIS टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. या फोनच्या पुढील बाजूस दोन कॅमेरे मिळतील. त्यापैकी एक 50MP ची लेन्स आहे आणि दुसरा 2MP लेन्स आहे.

बॅटरी

दोन्ही स्मार्टफोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहेत, जे 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात. मात्र, प्रो मॉडेल 66W जलद वायरलेस चार्जिंगला देखील समर्थन देतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo