Honor 10 स्मार्टफोन च्या बाबतित खुप आधीपासून लीक आणि रुमर्स येण्यास सुरुवात झाली होती आणि आता पर्यंत या स्मार्टफोन च्या बाबतित खुप काही समोर आले आहे. या लीक्स मध्ये असे ही समोर आले आहे की हा स्मार्टफोन ग्लोबली 15 मे ला लॉन्च केला जाऊ शकतो, या इवेंट साठी एक मीडिया इनवाइट पण समोर आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोन ची एक प्रमोशनल इमेज समोर आली होती, जी या बद्द्ल काही माहिती देत होती.
याव्यतिरिक्त आता नवीन माहिती जी या स्मार्टफोन च्या बाबतित समोर येत आहे, त्या नुसार, स्मार्टफोन चीन मध्ये 19 एप्रिल ला सादर करण्यात येणार आहे. कंपनी या स्मार्टफोन च्या लॉन्च साठी शांघाई मध्ये एक इवेंट करणार आहे. हा इनवाइट वेइबो वर दिसला आहे.
स्मार्टफोन च्या बाबतीत नवीन माहिती समोर आली आहे की हा नवीन ट्वाईलाईट कलर वेरिएंट मध्ये येईल. असेच काहीसे आपण Huawei P20 च्या घोषणे च्या वेळेस बघितले होते. तसे पाहता ही माहिती एका दुसर्या अँगल ने याआधी पण समोर आली आहे, आधीच्या लीक बद्दल बोलायचे झाले तर या लीक फोटो मध्ये स्मार्टफोन ग्लॉसी ट्वाईलाईट 3D बॅक पॅनल सह दिसला आहे.
हा स्मार्टफोन कंपनी ने भारतात यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च केला होता आणि याची किंमत Rs 29,999 होती. स्मार्टफोन मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळाली होती. तसेच हा स्मार्टफोन मेटल डिजाईन सह लॉन्च केला गेला होता. फोन मध्ये एक किरिन 970 ओक्टा-कोर प्रोसेसर, 6GB ची रॅम आणि 128GB ची स्टोरेज देण्यात आली होती.
आता जर Honor 10 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन बद्दल आता काही बोलणे चुकीचे ठरेल. या स्मार्टफोन च्या बाबतित असे वाटत आहे की येणार्या काळात याबद्दल खुप काही समोर येणार आहे.