Honor 10 स्मार्टफोन चे फोटो झाले ऑनलाइन लीक, Huawei P20 सारखी असू शकते डिजाईन
Honor 10 स्मार्टफोन चीन मध्ये 19 एप्रिलला लॉन्च केला जाऊ शकतो. पण याच्या लॉन्च च्या आधीच भरपूर बातम्या समोर आल्या आहेत.
आपल्या Huawei P20 आणि Huawei P20 Pro स्मार्टफोंस आता मागच्या महिन्यात लॉन्च केल्या नंतर कंपनी आता आपला नवीन स्मार्टफोन Honor 10 च्या रुपात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोन च्या बाबतीत आधी पण मोठी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की हा डिवाइस चीन मध्ये 19 एप्रिलला लॉन्च केला जाईल. आता आलेल्या नवीन माहितीनुसार असे समोर येत आहे की हा डिवाइस Huawei P20 सारख्या डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन ची एक इमेज इंटरनेट काही दिवसांपूर्वी लॉन्च झाली आहे.
या नव्या इमेज मध्ये स्मार्टफोन एका नॉच सह दिसला आहे. असेच काहीसे आपण Huawei P20 आणि Huawei P20 Pro मध्ये पण बघितले होते. याव्यतिरिक्त डिस्प्ले च्या खाली तुम्ही याचा फिंगरप्रिंट सेंसर बघू शकता. कंपनी कडून या स्मार्टफोन चा एक अधिकृत टीजर पण समोर आला आहे. हा डिवाइस पण Gradient Finish of Blueish Purple सह लॉन्च केला जाऊ शकतो. असेच काहीसे आपण Huawei P20 Pro स्मार्टफोन मध्ये पण बघितले आहे. पण कॅमेरा प्लेसमेंट मध्ये थोडा बदल बघायला मिळेल.
आत्ताच Honor 10 च्या रियर पॅनल ची लीक झालेल्या इमेज वरून COL-AL10 मॉडेल नंबर खुलासा झाला आहे. TENAA लिस्टिंग वरून समजत आहे की या डिवाइस चे दोन वेरिएंट्स 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज तसेच 64 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट सादर केले जातील. Honor 10 च्या CLO-AL00 मॉडेल नंबर मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे.
COL-TL10 Honor 10 मध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. COL-TL00 च्या लिस्टिंग वरून समोर आले आहे की या डिवाइस मध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 4 GB किंवा 6 GB रॅम असेल. हा नेटवर्क वेरिएंट्स किरिन 970 चिपसेट आणि प्री-इंस्टाल एंड्राइड 8.1 ओरियो वर चालेल. या वेरिएंट्स मध्ये माइक्रो SD कार्ड स्लॉट नसेल. Honor 10 चे डाइमेंशन 149.6 x 71.2 x 7.7 mm आणि वजन 153 ग्राम असेल. डिवाइस मध्ये 5.84 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल ज्याचे रेजोल्यूशन 2280 x 1080 पिक्सल असेल.
या डिवाइस मध्ये 3,320mAh ची क्षमता असलेली बॅटरी आहे. ऑप्टिक्स पाहता या डिवाइस मध्ये 24 आणि 16 मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फी साठी या डिवाइस मध्ये 24 मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन ओक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल ज्याचा क्लॉक स्पीड 2.36 GHz आहे. हा एक फ्लॅगशिप डिवाइस असल्याने यात किरिन 970 चिपसेट असण्याची शक्यता आहे.