digit zero1 awards

महत्त्वाची माहिती ! होळीच्या रंगांपासून फोन सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स…

महत्त्वाची माहिती ! होळीच्या रंगांपासून फोन सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स…
HIGHLIGHTS

होळीचा सण अगदी दोन दिवसांवर आला आहे.

होळी खेळताना फोनची काळजी कशी घ्यायची ?

पाणी आणि रंगापासून फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

होळीचा सण अगदी दोन दिवसांवर आला आहे. अनेक बाजारपेठा रंग, पिचकारी आणि इतर वस्तूंनी बहरलेल्या दिसत आहेत. होळी खेळताना रंग तर वापरतातच, पण गुलाल-पाणीशिवाय सणाची मजा काही येत नाही. दरम्यान, अशा परिस्थितीत आपल्या फोनची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. फोन पाणी किंवा गुलालाच्या संपर्कात आला तर तो खराबही होऊ शकतो. आता होळीच्या दिवशीही फोटोज काढावे लागतात, त्यामुळे फोन वापरावा लागतो. यामुळे फोन खराब होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. तर बघुयात फोन खराब न होण्यासाठी काही खास टिप्स…

हे सुद्धा वाचा : अप्रतिम बेनिफिट्ससह 296 रुपयांचा VI चा स्वस्त प्लॅन, इतर कंपन्यांचे प्लॅन्सही बघा

ग्लास बॅक कव्हर 

फोन पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्लास बॅक कव्हर असणे आवश्यक आहे. हे फोनला फक्त पाण्यापासूनच नाही तर रंगांपासूनही सुरक्षित ठेवतो. तुम्ही ते ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील खरेदी करू शकता.

वॉटरप्रूफ कव्हर 

फोन पाण्यामुळे खराब होऊ नये, म्हणून त्यावर वॉटरप्रूफ कव्हर लावावे. यामुळे फोन पाण्यापासून सुरक्षित राहतो. ते तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीकडे किफायतशीर किमतीत खरेदी करता येईल. तुम्ही ते 100 किंवा 150 रुपयांना कुठेही खरेदी करू शकता.

 एवढे करूनही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. होळीच्या वेळी तुम्ही तुमच्या फोनसाठी नेहमी पॉलिथिन सोबत ठेवणे गरजेचे आहे. सेफटीसाठी तुमचा फोन नेहमी पॉलिथिन मध्येच ठेवा. यामुळे गुलाल, पाणी आणि रंग इतर सर्व गाष्टींपासून तुमच्या स्मार्टफोनचे संरक्षण होईल. 

 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo