Holi 2025 Smartphone Tips: होळी खेळताना स्मार्टफोनची काळजी कशी घ्यावी? पाण्यात फोन गेल्यास लगेच करा ‘हे’ काम

होळी खेळताना स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफी करणे आणि कॉमन झाले आहे.
होळी खेळताना तुमचा स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स आणि फोन पाण्यात पडल्यास काय करावे?
Holi 2025 Smartphone Tips: रंगांच्या सणाची, होळीची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. आज होलिकादहन असून उद्या धूलिवंदन साजरी करायला सर्व सज्ज झाले आहेत. होळी हा एक असा सण आहे, जो साजरा करताना रंग, गुलाल आणि पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. दरम्यान, होळी खेळताना तुमचा स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारण तुम्ही होळी खेळताना स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफी देखील करत असता.
अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला होळी खेळताना तुमचा स्मार्टफोन कसे सुरक्षित ठेवू शकता. तर, तुमचे फोन जर पाण्यात पडले तर काय करावे? याबद्दल महिती देणार आहोत.
Holi 2025 Smartphone Tips
वॉटरप्रूफ मोबाईल पाउच: होळी खेळताना तुमचा स्मार्टफोन आणि इअरबड्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच किंवा झिप लॉक बॅगचा वापर करता येईल. हे दोन्ही वस्तू तुमचे स्मार्टफोन आणि इअरबड्स खराब होण्यापासून वाचवतात.
ट्रान्सपरंट कव्हर: जर तुम्हाला होळी खेळताना तुमच्या स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफी करायची असेल तर, ट्रान्सपरंट कव्हर्सचा वापर करता येईल. जर तुम्ही होळी खेळताना स्मार्टफोन आणि इअरबड्स वारंवार वापरत असाल तर या कव्हर्सचा वापर नक्की करा. यामुळे तुमचा स्मार्टफोन आणि इअरबड्स पूर्णपणे सुरक्षित राहतील.
पॉलीबॅग्ज: अनेकदा तुमच्याकडून वॉटरप्रूफ साधने खरेदी करण्याचे राहून जाते आणि ऐन वेळी तुमच्याकडे फोन कव्हर करण्यास काहीच नसते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच नसेल तर, तुम्ही पॉलीबॅग देखील वापरू शकता. तुमचा स्मार्टफोन आणि इअरबड्स पॉलीबॅगमध्ये संपूर्ण कव्हर करून घ्या. यामुळे स्मार्टफोन आणि इअरबड्स पाण्याच्या थेंबांपासून सहज सुरक्षित राहतील.
जर तुमचा फोन पाण्यात पडला तर काय करावे?
- तुमचा फोन पाण्यात पडला असेल तर, तुम्ही तुमच्या फोनवर हार्ड कव्हर लावले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे. कव्हरमध्ये असलेले पाणी तुमच्या फोनला आणखी नुकसान पोहोचवू शकते. यामुळे डिस्प्लेमध्ये पाणी जाण्याचा धोका अधिक असतो.
- तुमचा स्मार्टफोन पाण्याच्या संपर्कात आला आहे, तर तो ताबडतोब बंद करा. स्विच बंद करताच शॉर्ट सर्किटचा धोका असणार नाही.
- तुमचा स्मार्टफोन पाण्यात भिजल्यानंतर, तुम्ही ताबडतोब तुमचे सिम कार्ड आणि मायक्रो SD कार्ड काढून टाकावे. यामुळे तुमचे सिम आणि मायक्रोएसडी कार्ड खराब होण्यापासून वाचेल. तर, तुम्ही सिम ट्रे काढताच आत गेलेले पाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल.
- फोनमध्ये पाणी गेल्यानंतर तुम्ही तो जोरात हलवून ड्राय शकता. अनेक वेळा लोक त्यांचा ओला स्मार्टफोन सुकविण्यासाठी हेअर ड्रायर वापरतात. मात्र, लक्षात घ्या की, गरम हवा स्मार्टफोनमधील घटकांना नुकसान पोहोचवू शकते आणि तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile