HMD Skyline नवा स्मार्टफोन भारतात लाँच! 108MP मेन कॅमेरासह स्वतःच करता येईल रिपेयर, पहा किंमत

Updated on 17-Sep-2024
HIGHLIGHTS

HMD ने नवा HMD Skyline स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच केला.

कंपनीने HMD Skyline फोन Gen2 Repairability फीचरसह सादर केला आहे.

फोनची सेल 17 सप्टेंबरपासून HMD आणि Amazon India वर सुरू होईल.

नवी आणि प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता HMD ने नवा HMD Skyline स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, जो रिपेअर करण्यायोग्य डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. कंपनीने फोनच्या या फीचरला Gen2 Repairability असे नाव दिले आहे. लक्षात घ्या की, स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने या फोनचे मागील कव्हर उघडून वापरकर्ते सहजपणे फोनमधील समस्यांचे निराकरण करू शकतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात HMD Skyline फोनची किंमत आणि स्पेक्स-

Also Read: लेटेस्ट Realme P2 Pro 5G ची आज भारतात दोन तासांची Special सेल, मिळतील अगदी जबरदस्त ऑफर्स

HMD Skyline ची भारतीय किंमत

कंपनीने नवे HMD Skyline स्मार्टफोन फक्त एकाच म्हणजे सिंगल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह सादर केले आहे. कंपनीने या वेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची सेल 17 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून HMD आणि Amazon India वर सुरू होईल.

HMD Skyline चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HMD Skyline फोनमध्ये 6.55 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सपोर्ट देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Octa Core Snapdragon 7s Gen 2 4nm प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये पॉवरचा 4600mAh बॅटरी आहे, ज्यासोबत तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

फोटोग्राफीसाठी, तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे, जो OIS + EIS सपोर्टसह येतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील उपलब्ध आहे. तर, 50MP टेलिफोटो सेन्सर देखील मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये OZO Spatial Audio capture with wind-noise cancellation, Capture Fusion technology, 50mm Portrait mode, 4K video capture असे फीचर्स देखील मिळतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :