HMD ग्लोबल ने 29 मे ला रशिया मध्ये होणार्या इवेंट साठी मीडिया इनवाइट्स पाठवले आहेत. कंपनी ने ट्वीटर वर जाहीर केले आहे की इवेंट मध्ये कंपनी काही तरी नवीन शेयर करणार आहे. कंपनी ने ट्वीट मध्ये हॅशटॅग #ChargedUp चा वापर केला आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे की डिवाइस मध्ये मोठी बॅटरी किंवा फास्ट चार्जिंग क्षमता असेल. पण, HMD ने या हॅशटॅग बद्दल कोणताही खुलासा नाही केला आणि आणि आता इवेंट मध्ये लॉन्च केल्या जाणार्या स्मार्टफोन ची पण कोणतीही माहिती दिली नाही.
अनुमान लावला जात आहे की इवेंट मध्ये Nokia X6 ग्लोबली लॉन्च केला जाईल आणि सोबतच Nokia 3 आणि Nokia 5 चे अपग्रेडेड वर्जन सादर केले जातील. कंपनी Nokia 6.1 प्रमाणे कंपनी एंट्री-लेवल Nokia 3 आणि मिड-रेंज Nokia 5 चा 2018 वर्जन सादर करू शकते.
काही दिवसांपूर्वी एका यूजर एजेंट च्या प्रोफाइल वरून Nokia 3.1 दिसला होता, तसेच HMD च्या CPO जुहो सरविकास ने Nokia 5.1 बद्दल माहिती दिली होती. पण या दोन्ही स्मार्टफोन्स चे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी गुलदस्त्यात आहेत.
Nokia 3 मीडियाटेक प्रोसेसर सह लॉन्च केला गेला होता आणि यावर्षी पण हा डिवाइस याच प्रोसेसर सह लॉन्च केला जाईल असा अंदाज आहे. HMD Global च्या या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक हीलियो P22 SoC असण्याची शक्यता आहे जो अनेक AI क्षमतां सह येणारा साधारण चिपसेट आहे. Nokia 5.1 स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो जो आधीच्या Nokia 5 मधील स्नॅपड्रॅगन 430 SoC पेक्षा चांगला आहे.
अजूनतरी अशी कोणतीच माहिती समोर आली नाही की कंपनी अन्य स्मार्टफोन्स पाने इवेंट मध्ये लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या Nokia X6 बद्दल कंपनी ने सांगितले होते की लवकरच हा डिवाइस इतर बाजारांमध्ये पण लॉन्च केला जाईल. Nokia X6 ची भारतीय किंमत 22,000 रुपयांच्या आसपास असेल.