Nokia X6 जगभरात Nokia 6.1 Plus म्हणून होत आहे लॉन्च

Updated on 20-Jul-2018
HIGHLIGHTS

HMD Global ने आपला Nokia X6 स्मार्टफोन जगभरात Nokia 6.1 Plus नावाने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या नवीन नावा सोबत हा डिवाइस हाँगकाँग मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, नवीन नावा सह हा डिवाइस मिळवणारा हा पहिला देश आहे.

HMD Global’s Nokia X6 Now Begins to Rollout in the World as Nokia 6.1 Plus: तसे पाहता या दोन्ही स्मार्टफोंस मध्ये मोठा फरक दिसतो, एकीकडे Nokia X6 वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वर्जन मध्ये सादर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे Nokia 6.1 Plus डिवाइस फक्त 4GB/64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात येणार आहे. किंवा मग असे म्हणूया हा डिवाइस अनेक वेरिएंट्स मध्ये सादर न करता कंपनी ने याला फक्त एकाच वर्जन मध्ये सादर केले आहे. 

या डिवाइस ची किंमत हाँगकाँग मध्ये HKD 2,288 म्हणजे जवळपास 292 डॉलर आहे, तसेच हा 24 जुलै पासून तिथे याची विक्री सुरू होईल. आता हे बघावे लागेल की हाँगकाँग नंतर हा इतर किती देशांमध्ये लॉन्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा भारतात पण लॉन्च केला जाईल का याची वाट बघावी लागेल आणि जर हा भारतात लॉन्च करण्यात आलाच तर हा कोणत्या सेगमेंट मध्ये लॉन्च केला जातो ते पहावे लागेल. पण या सर्व प्रश्नांची अजूनतरी उत्तर मिळाली नाहीत. पण आशा आहे की लवकरच या अफवांना उत्तर मिळेल. 

हा फोन ड्यूल सिम सपोर्ट सोबतच एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च करण्यात आला आहे. हा डिवाइस 5.8-इंचाच्या FHD+ 1080×2280 पिक्सल रेजोल्यूशन डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा डिवाइस को 2.5D कर्व ग्लास डिस्प्ले आणि गोरिला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. 

फोन मधील कॅमेरा पाहता यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन वेगवेगळ्या सेंसर चा कॉम्बो आहे. फोन च्या फ्रंट ला एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन ची स्टोरेज पाहता तुम्ही ती माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये एक 3060mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, त्याचबरोबर यात कनेक्टिविटी साठी इतर गोष्टी आहेत. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :